अवघ्या दहा मिनिटांमध्ये सामन्यात चार गोल्स झाले. यापैकी ब्रिटनने एक गोल केला. तर भारताने अवघ्या नऊ मिनिटांमध्ये तीन गोल करत हाफ टाइममध्ये ३-२ ची आघाडी मिळवली. ब्रिटनने तिसऱ्या क्वार्टर्समध्ये ३-३ ची बरोबर केल्याने अंतीम १५ मिनिटं महत्वाची ठरली. शेवटच्या १५ मिनिटांनंतर सामन्याचे अंतिम स्कोअरकार्ड ४-३ असं होतं.सामन्यात भारताने ब्रिटनला तोडीस तोड प्रत्युत्तर दिलं. ब्रिटनच्या दिग्गज संघाला भारताच्या रणरागिणींनी नाकी नऊ आणलं. मात्र सरतेशेवटी भारताला पराभवाला सामोरं जावं लागलं आहेथरारक सामन्यात भारतीय महिला हॉकी संघाचा पराभव, ग्रेट ब्रिटनचा 4-3 ने विजयटोकिया ऑलिम्पिक 2020 मध्ये भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत पाच पदके जिंकली आहेत. भारतीय हॉकी पुरुष संघाने इतिहास घडविल्यानंतर वेळ महिला हॉकी संघ इतिहास रचणार आहे. ब्रिटन विरुद्ध सुरु असलेल्या सामन्यात ३-२ अशी आघाडी भारताने घेतली आहे.