Friday, May 3, 2024
Homeनगरछु मंतर म्हणताच कोणाचे पैसे झाले दुप्पट ?

छु मंतर म्हणताच कोणाचे पैसे झाले दुप्पट ?

श्रीगोंदा |प्रतिनिधी| Shrigonda

तालुक्यातील काष्टी येथे पैसे दुप्पट करून देण्याच्या आमिषाने एका मांत्रिकाने अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घातला. त्याच्याकडील आकडा ऐकताच पोलिसांनी तत्परता दाखवत त्यास अटक केली. मात्र पोलीस ठाण्यात दाखल झालेली चोरीची तक्रार व मांत्रिकाकडील प्रत्यक्ष रक्कम पाहताच तातडीने दाखल झालेल्या पुरवणी तक्रारी व आकड्यांची संख्या पाहता छु मंतर म्हणताच कोणाचे पैसे दुप्पट झाले याची काष्टीसह तालुकाभरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

- Advertisement -

रोहिदास सोमा थोरात (रा. माळीनगर ता. श्रीगोंदा, मुळ रा. उस्मानाबादे) असे या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयित भोंदूबाबाचे नाव आहे. याप्रकरणी 27 ऑगस्ट रोजी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अमोल माणीक पाचपुते यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार त्यांच्या हॉटेल जयश्री परमीट रुमचा भरणा करण्यासाठी एक लाख साठ हजार रुपयांची रक्कम अज्ञात व्यक्तीने चोरून नेली होती. यातील रक्कम अधिक असण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने पोलीस त्याचा शोध घेत होते.

2 ऑगस्ट रोजी पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली संशयित रोहिदास थोरात यास उस्मनाबाद येथून गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी सपोनि तेजनकर, अंकुश ढवळे , पोना संतोष फलके , पोकॉ प्रकाश मांडगे, पोकॉ किरण बोराडे , पोकॉ अमोल कोतकर व कर्मचारी यांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून 11 लाख 50 हजार रुपयांची रोकड, 25 हजार रुपये किमतीची गुन्ह्यात वापरलेली एक मोटारसायकल अशी एकूण 11 लाख 75 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा उघडकीस आणला आहे.

यानंतर पुरवणी तक्रार दाखल झाली असून यामध्ये फिर्यादीचा भाऊ राजेंद्र पाचपुते यांनी आर.के.कलेक्शनचे कपड्याच्या दुकानाचे खरेदीसाठी ठेवलेले हॉटेल जयश्रीचे काउंटरमधून चोरीस गेलेले दहा लाख असे एकूण अकरा लाख साठ हजार रक्कम आरोपी थोरात याने चोरल्याचे म्हटले आहे.

या गुन्ह्यात अगोदर केवळ एक लाख साठ हजार चोरी केल्याची फिर्याद दाखल झाली नंतर मात्र पुरवणी गुन्ह्यात अजून दहा लाख चोरी बाबत जबाब नोंदवला आहे. प्रत्यक्ष मांत्रिकाकडे फार मोठी रक्कम सापडल्याची चर्चा आहे. यामुळे ज्यांना दुप्पट रक्कम करून देण्याच्या बहाण्याने लुबाडले गेले असे लोक पुढे आल्यानंतरच यातील वास्तव समोर येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या