Friday, May 3, 2024
HomeनाशिकVideo : गंगापूर धरण @९८; गोदावरीला येणार पूर

Video : गंगापूर धरण @९८; गोदावरीला येणार पूर

नाशिक | प्रतिनिधी Nashik

गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात (Gangapur Water Shed) संततधार पाऊस सुरु आहे. सकाळी गंगापूर धरण ९८ टक्के भरले आहे. त्यामुळे दुपारी दोन वाजेच्या दरम्यान आणखी एक हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार आहे. याबाबतची माहिती प्रशासनाकडून नुकतीच देण्यात आली आहे….

- Advertisement -

गंगापूर धरणसमूहातील धरणाची पाणीपातळी (Dam Water Level) वाढली असून ९२ टक्के झाली आहे. कालपासून गंगापूर धरणातून १ हजार ५३० क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात होता. दरम्यान, आज सकाळी नऊ वाजता पाण्याचा विसर्ग वाढवून २ हजार ५०० क्युसेकवर नेण्यात आला.

यानंतर आज दुपारी पुन्हा हा विसर्ग वाढवून ३ हजार ५०० क्युसेक करण्यात आला आहे. परिणामी गोदावरी नदीला पहिल्यांदाच पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होणार आहे.

याबाबतची माहिती आज सकाळी जलसंपदा विभागाकडून (Irrigation & Water resource dept) देण्यात आली. गेल्या तीन-चार दिवसांपासून नाशिकसह परिसरात संततधार पावसाने ठाण मांडले आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील धरणांची पाण्याची पातळी वाढली आहे. सर्वच धरणे १०० टक्क्यांकडे वाटचाल करत आहेत. तर धरणांची पाण्याची पातळी वाढत असल्यामुळे नियमानुसार पाणी धरणातून सोडण्यास सुरुवात झाली आहे.

सद्यस्थितीत दारणा (Darna Dam) धरणातून १० हजार ६० क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. तर कडवा (Kadawa Dam) मधून २ हजार २०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. आळंदी धरणातून (Alandi Dam) ३० तर वालदेवीतून (Waldevi Dam) १८३ क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. तर गंगापूर धरणातून (Gangapur Dam) सद्यस्थितीत २ हजार ५ क्युसेक विसर्ग सुरु आहे.

दरम्यान, नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून (Nandur Madhyameshwar Dam) १६ हजार ५८२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु असून पाणी जायकवाडीकडे झेपावू लागले आहे. नदीकाठी पाण्याची पातळी वाढणार असून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या