Friday, May 3, 2024
Homeनाशिकपुणेगाव, वाघाड @९० टक्के; पालखेडमधून विसर्ग सुरु

पुणेगाव, वाघाड @९० टक्के; पालखेडमधून विसर्ग सुरु

ओझे | वार्ताहर Oze

दिंडोरी तालुक्यात गेल्या चार दिवसापासून समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे तालुक्यातील धरण साठ्यामधील पाणी पातळी वाढण्यास मदत होत आहे….

- Advertisement -

दिंडोरी पश्चिम भागामध्ये जोरदार पाऊस पडत असल्यामुळे वाघाड धरण ९४% भरले आहे. तर करंजवण धरणाचा विचार करता हे तालुक्यातील सर्वात मोठे धरण असल्यामुळे धरणातील पाणीसाठा ५६% झाला असून पाणीसाठा संतगतीने वाढताना दिसत आहे.

नाशिक जिल्ह्यातील सर्वात महत्वाचा व जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार भुजबळ यांचा ड्रीम प्रोजेक्ट मांजरपाडा (देवसाणे) प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यामुळे प्रकल्पातून पुणेगाव धरणात मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्यामुळे पुणेगाव धरणाचा पाणीसाठा ९१% वर पोहचला आहे.

सध्या ओझरखेड धरणाचा पाणीसाठा ४०% असला तरी पुणेगाव धरणातून पाणी सोडल्यास ओझरखेंड धरण भरण्यास वेळ लागणार नाही. त्याप्रमाणे पुणेगाव धरणातूनच तिसगाव धरणात पाणी जाते. तिसगाव धरणाचा पाणीसाठा २३.२४% असला तरी पुणेगावाचे पाणी तिसगाव मध्ये सोडल्यास धरण भरण्यास मदत होईल.

दिंडोरी तालुक्यातील सर्व धरणाचे पाणी पालखेड समूहात जमा होत असल्यामुळे व सध्या नद्या खळखळून प्रवाहीत झाल्यामुळे पालखेंड धरण ९५% भरले असून धरणातून कादवा नदी पात्रात ८०० क्युसेस पाण्याचा विसंर्ग करण्यात येत आहे.

तालुका प्रशासनाकडून कादवा नदीपात्रा शेजारील गावाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या