Saturday, May 4, 2024
HomeUncategorizedगुगलच्या ‘या’ फीचरमुळे डोळ्यांचा ताण होणार कमी

गुगलच्या ‘या’ फीचरमुळे डोळ्यांचा ताण होणार कमी

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

गेल्या वर्षी गुगलने (Google) मोबाइल युझर्ससाठी गुगल सर्चसाठीचे (Google Search) डार्क मोड (Dark Mode) हे फिचर लॉन्च केले होते. आता हे फीचर डेस्कटॉपवरदेखील उपलब्ध करण्यात आले आहे…

- Advertisement -

गुगलने अँड्रॉइड (Android) आणि आयओएस (iOS) अॅप्ससाठी डार्क मोड फिचर २०२० मध्ये आणले. २०२० मध्येच डेस्कटॉप युझर्ससाठी (Desktop User) हे फीचर उपलब्ध करण्याची घोषणा गुगलने केली होती. त्यानुसार फेब्रुवारी महिन्यात सर्च डेस्कटॉपवर डार्क मोडची चाचणी सुरू करण्यात आली होती.

आता डार्क मोड फीचर डेस्कटॉपवर उपलब्ध करण्यात आले आहे. पुढील काही आठवड्यात हे फीचर पूर्णपणे कार्यान्वित होणार आहे. यामुळे आता डेस्कटॉपवर गुगल सर्च या ब्राउझिंग इंजिनवरून सर्च करणाऱ्या युजर्सना ब्राईट वेबपेजेसचा (Web Pages) रंग करडा (Grey) करता येईल. यामुळे डोळ्यावर येणारा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.

असा करा डार्क मोड सुरु

  • सेटिंग्जवर क्लिक करा.

  • Appearance वर क्लिक करा.

  • डिफॉल्टमध्ये (Default) डिव्हाइस निवडा.

  • त्यानंतर अनेक पर्याय उपलब्ध होतील. त्यातील डार्क किंवा लाईट यापैकी ऑप्शन निवडा.

  • सेव्ह बटणावर क्लिक करा.

- Advertisment -

ताज्या बातम्या