Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रCruise Drug Bust क्रूजवर पुन्हा छापा, आणखी ड्रग्ज जप्त, सहा जण ताब्यात

Cruise Drug Bust क्रूजवर पुन्हा छापा, आणखी ड्रग्ज जप्त, सहा जण ताब्यात

अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने (NCB) मुंबईत रेव्ह पार्टीवर केलेल्या कारवाईत बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक आली. या प्रकरणात आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांची अटक केली होती. आज पुन्हा एनसीबीच्या टीमने क्रूजवर (cruise) छापा मारला. त्यानंतर आणखी आमली पदार्थ मिळाले असून अजून सहा जणांना ताब्यात घेतले आहे. .

शाहरुखने म्हटले होते, मुलाने ड्रग्स घ्यावे, डेटींग करावी अन…

- Advertisement -

सोमवारी एनसीबीचे सहायक संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली सकाळी ६ वाजता २० अधिकाऱ्यांची टीम क्रूजवर पोहचली. शनिवारी क्रूजवल असलेल्या १८०० जणांची यादी मिळवली.

मुंबईतील समुद्रात एका क्रूझवर आयोजित ड्रग्ज पार्टीत ताब्यात घेण्यात आलेल्या अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला चार तासांच्या चौकशीअंती अमलीपदार्थ नियंत्रक कक्षानं (NCB) अखेर अटक केली आहे. आर्यन खानसह एकूण तीन जणांना याप्रकरणी अटक केली होती. या तिघांना एका दिवसाची कोठडी मिळाली होती. आज त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

तीन दिवस पार्टी

हे क्रूझ मुंबईवरून गोव्याला जात होते. शनिवारी दुपारी क्रूझ निघाले होते. 4 ऑक्टोबर रोजी ते मुंबईत येणार होते. तीन दिवसासाठी म्युझिकल प्रवासासाठी प्रवाशांकरता फूल पॅकेज तयार करण्यात आलं होतं. या क्रूझवर ‘Cray’Ark’ नावाने इव्हेंट ऑर्गनाइज करण्यात आले होते.

5 लाखापर्यंतची एन्ट्री फी

या पार्टीसाठी तगडी फी वसूल करण्यात आली होती. ज्या जहाजावर ही पार्टी सुरू होती, ते जहाज कॉर्डेलिया क्रूझ कंपनीचे होते. ही पार्टी फॅशन टीव्ही इंडिया आणि दिल्लीच्या Namascray Experience नावाच्या कंपनीने आयोजित केली होती. भर समुद्रात होणाऱ्या या पार्टीसाठी 80 हजारापासून ते 5 लाखापर्यंतची फी ठेवण्यात आली होती.

मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज जप्त

या क्रुझवरून एनसीबीने मोठ्या प्रमाणावर प्रचंड ड्रग्ज जप्त केलं आहे. एनसीबीने 30 ग्रॅम चरस, 20 ग्रॅम कोकीन, 25 एमडीएमए ड्रग्जच्या टॅबलेट आणि 10 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त कर्मयात आलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, या प्रकरणात सहभागी असलेल्या लोकांनी आपल्या पँट, अंडरवेअर, कॉलरच्या सिलाईमध्ये तसंच महिलांनी आपल्या पर्सच्या हॅंडलमध्ये लपवून आणलं होतं.

- Advertisment -

ताज्या बातम्या