Saturday, May 4, 2024
Homeक्रीडाIPL 2021 Eliminator : बंगळूर भिडणार आज कोलकातासोबत; पराभूत संघ जाणार स्पर्धेबाहेर

IPL 2021 Eliminator : बंगळूर भिडणार आज कोलकातासोबत; पराभूत संघ जाणार स्पर्धेबाहेर

शारजाह | Sharjah

आयपीएल २०२१ (ipl 2021) मध्ये आज एलिमिनेटर (Eliminator) सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (royal challengers bangalore) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (kolkata knight riders) यांच्यात शारजाह मैदानावर होणार आहे…

- Advertisement -

सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स आणि हॉटस्टार वाहिनीवर सायंकाळी ७:३० वाजता करण्यात येणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) संघाचा कर्णधार विराट कोहली कर्णधार म्हणून आपली शेवटची आयपीएल खेळणार असल्यामुळे आपल्या संघाला विजेतेपद मिळवून देण्यात तो कोणतीही कसर बाकी ठेवणार नाही. हे मात्र निश्चित दिसत आहे.

तर आयपीएलच्या (ipl) दुसऱ्या निर्णायक टप्प्यात आपला खेळ कमालीचा उंचावलेला कोलकाता बंगळूरविरुद्ध महत्वपूर्ण लढतीत विजयी सिलसिला कायम राखण्यासाठी सज्ज झाला आहे.

दोन्ही संघांची तुलना केल्यास कोलकाताचा संघ अधिक वरचढ दिसून येत आहे. पहिल्या हाफमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाची परिस्थिती अधिक बिकट झाली होती. ७ सामन्यांमध्ये ५ पराभव आणि २ विजयांनी केकेआर गुणतालिकेत सातव्या स्थानावर होता.

मात्र जसे आयपीएल दुसऱ्या निर्णायक टप्प्यात यूएईत परतले. तशी केकेआरची कामगिरी अधिक उंचावत गेली. आपल्या ७ सामन्यांमध्ये ५ विजय आणि २ पराभवांसह केकेआरने १४ गुणांसह चौथ्या स्थानावर धडक मारून सरस धावगतीच्या जोरावर बाद फेरीतील आपला प्रवेश निश्चित केला.

दुबईत असलेल्या संथ खेळपट्टीवर कोलकाताची फिरकी गोलंदाजी अधिक प्रभावी ठरली आहे. वरुण चक्रवर्ती आणि अनुभवी फिरकीपटू गोलंदाज सुनील नारायण यांचा सामना करणे प्रतिस्स्पर्धी संघांना एक मोठं आव्हान ठरत आहे.

बांगलादेश संघाचा अनुभवी अष्टपैलू फिरकीपटू शाकिब अल हसनच्या समावेशाने ही फिरकीची तिकडी अधिक भक्कम झाली आहे. मात्र सलामीवीर शुभमन गील आणि वयंकटेश अय्यर यांनी मागिल काही सामन्यांमध्ये संघाला चांगली सुरुवात करून दिली आहे. चिंतेची बाब म्हणजे कर्णधार ऑईन मॉर्गनचा खराब फॉर्म ही संघासाठी डोकेदुखी ठरत आहे.

कर्णधार विराट कोहली ग्लेन मॅक्सवेल देवदत्त पडिकल संघासाठी सातत्यानं धावा करत आहेत. ही बंगळूर संघासाठी उजवी बाजू ठरत आहे. त्यांना युवा यष्टीरक्षक फलंदाज श्रीकर भरत चांगली साथ देत आहे.

मात्र संघासाठी चिंतेची गोषट म्हणजे अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज अब्राहाम डिव्हिलिअर्सची बॅट अद्याप तळपलेली नाही. त्याच्याकडून मोठी खेळी संघाला अपेक्षित आहे. तर सध्या पर्पल कँपवर अधिराज्य करणारा हर्षल पटेल कोलकात्याच्या फलंदाजीला लगाम लावण्यात यशस्वी ठरणार का ? ते पाहणे महत्वाचे असेल.

सलिल परांजपे, नाशिक.

- Advertisment -

ताज्या बातम्या