Saturday, May 4, 2024
Homeनाशिकलाभार्थींचे अनुदान स्थगित

लाभार्थींचे अनुदान स्थगित

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा (Sanjay Gandhi Niradhar Anudaan Yojana) लाभ घेणार्‍या ग्रामीण भागातील हयातीचे दाखले सादर न केलेल्या लाभार्थ्यांनी हयातीचे प्रमाणपत्र व बँक खाते क्रमांक (Bank account number) आधार (aadhar card) संलग्न करण्यात येवून बँकेकडील पावतीसह बँक पासबुक (Bank passbook) एकत्रीत सादर करावे.

- Advertisement -

सदर प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच विशेष अर्थसहाय्य योजनेचा लाभ सुरु करण्यात येईल, असे आवाहन तहसिलदार (tahasildar) चंद्रजित राजपूत (chandrajit rajput) यांनी पत्रकाव्दारे केले आहे. विशेष सहाय्य योजनेतील तहसिल कार्यालय ग्रामीणमध्ये हयात असल्याबाबतची तपासणी 1 जानेवारी 2021 पासून सुरु करण्यात आली आहे. हयातीचे दाखले सादर करण्याची मुदत 31 मार्च 2021 पर्यंत देण्यात आली होती.

तथापी 3 मे 2021 च्या शासन निर्णयान्वये हयातीचे दाखले सादर करण्याची मुदत जून 2021 पर्यत वाढविण्यात आली होती. त्या अनुषंगाने कार्यालयास 11 हजार 850 दाखले प्राप्त झाले असून, सद्यस्थितीत 11 हजार 850 हयातीचे प्रमाणपत्र सादर केलेल्या लाभार्थ्यींचे देयके तयार करण्यात आले आहेत. 3 मे च्या शासन निर्णय प्रमाणे 1 एप्रिल ते 30 जून 2021 या कालावधीत हयात प्रमाणपत्र सादर न केलेल्या लाभार्थ्यांचे जुलै 2021 पासून अर्थसहाय्य बंद करण्यात यावे अशा सुचना प्राप्त झाल्या आहेत.

उर्वरीत लाभार्थींचे अनुदान तात्पुरत्या स्वरुपात हयातीचे दाखले सादर न झाल्यामुळे स्थगित करण्यात येत आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी हयातीचे प्रमाणपत्र त्वरीत विशेष सहाय्य योजना तहसिल कार्यालय मालेगाव (ग्रामीण) येथे तात्काळ सादर करावे, असे आवाहन तहसिलदार राजपूत यांनी पत्रकाच्या शेवटी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या