Saturday, May 4, 2024
Homeनगर1 कोटीचे सोने चोरीतील दोघे जेरबंद

1 कोटीचे सोने चोरीतील दोघे जेरबंद

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

एसटी बसने प्रवास करणार्‍या सराफी व्यावसायिकाच्या एक कोटी रूपये किंमतीचे 2 किलो 110 ग्रॅम वजनाचे सोन्याच्या दागिण्यांची व 18 लाख रोकड असणारी बॅग पळवणार्‍या दोघांना कर्जत व पुणे पोलीसांनी कर्जत येथून अटक केली. त्यांच्याकडून 1 किलो सोन्याचे दागिणे जप्त करण्यात आले आहेत.

- Advertisement -

मारुती राजाराम पिटेकर, (45, रा. माळंगी, ता. कर्जत, व आनंता लक्ष्मण धांडे, (40, रा. वालवड, ता.कर्जत, जि. अहमदनगर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी पुणे जिल्ह्यातील राजगड पोलीस स्टेशन गुन्हा दाखल होता. त्यानुसार 10 ऑक्टोबर 2021 रोजी दुकानातील विक्रीचे दागिण्यांची बॅग घेऊन सराफी व्यावसायिक कर्नाटक येथून कोल्हापूरच्या दिशेने एसटी बसने प्रवास करीत होते. 12.45 ते 3.00 वा चे सुमारास कोल्हापूर ते खेड शिवापूर टोल नाका दरम्यान त्यांचे सोबत होळी, कर्नाटक पासून प्रवास करणारे प्रवासी सीट नंबर 23, 24 ,व 25 वरून प्रवासी यांनी व्यावसायिकाची सोन्याचे 18 कॅरेट चे 2 किलो 110 ग्रॅम सोन्याचे दागिणे व 18 लाख रूपये अशी एकूण 99 लाख 24 हजार रूपये किंमतीचा ऐवज असणारी खाकी रंगाची पाठीवर अडकवण्याची बॅग त्यांनी पळवुन नेली.

पोलसांनी तांत्रिक तपास करत संशयितांचा माग काढला. दोघा संशयितांना त्यांच्या घरून अटक केली. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सपोनि सतीश गावित, सुरेश माने, पोलीस जवान शाम जाधव, जालिंदर पाचपुते, सुनील खैरे, गोवर्धन कदम आणि राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील, सपोनि प्रवीण पोरे यांनी ही कामगिरी केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रवीण पोरे करत आहेत. पुणे पोलीस सदर प्रकरणात खोलवर तपास करून आणखी कोण कोण सामील आहेत याबाबत सखोल तपास करून आरोपी अटक करणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या