Saturday, May 4, 2024
Homeनगरअतिवृष्टीने नुकसानीच्या पहिल्या हप्त्याचे 3 कोटी मंजूर- आमदार काळे

अतिवृष्टीने नुकसानीच्या पहिल्या हप्त्याचे 3 कोटी मंजूर- आमदार काळे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

विधानसभा मतदार संघात परतीच्या पावसाने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना भरपाई मिळवून देण्यासाठी या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना देऊन भरपाई मिळावी यासाठी पाठपुरावा सुरू होता. त्या पाठपुराव्याची दखल घेऊन महाविकास आघाडी सरकारने अतिवृष्टीच्या नुकसानीपोटी कोपरगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना पहिल्या हफ्त्याचे 3 कोटी 09 लाख नुकसान भरपाई मंजूर केली असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.

- Advertisement -

कोपरगाव विधानसभा मतदार संघात परतीच्या पावसाने मोठे नुकसान होऊन नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरुच होता. त्याबाबत राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अहमदनगर जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले असता त्यांचे मतदार संघाच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधून मतदार संघात परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची दिवाळीच्या आत भरपाई मिळावी, अशी मागणी केली होती. त्या मागणीची दखल घेऊन बाधित शेतकर्‍यांना पहिल्या हफ्त्याचे 3 कोटी 09 लाख नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे.

ही रक्कम लवकरच शेतकर्‍यांच्या खात्यात वर्ग केली जाणार असून त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नेहमीप्रमाणे महाविकास आघाडी सरकार शेतकर्‍यांच्या मागे खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री हसन मुश्रीफ, मदत पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, मदत पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे आभार मानले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या