Saturday, May 4, 2024
Homeदेश विदेशकेंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाचं Twitter अकाउंट हॅक; थेट 'एलन मस्क'चं नाव...

केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाचं Twitter अकाउंट हॅक; थेट ‘एलन मस्क’चं नाव प्रोफाइलला

दिल्ली | Delhi

सायबर क्राईम आणि हॅकिंग (Cyber ​​crime and hacking) या संदर्भात वेळोवेळी नागरिकांना सतर्क करणाऱ्या केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचंच (Ministry of Information and Broadcasting) ट्विटर अकाउंट हॅक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

- Advertisement -

Sanskruti Balgude : संस्कृती बालगुडेच्या मनमोहक सौंदर्याची नेटकऱ्यांना भुरळ

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे ट्विटर अकाऊंट (Twitter account hacked) आज बुधवारी हॅक करण्यात आले. बुधवारी सकाळीच या अकाऊंटवर जगातील सर्वात श्रीमंत उद्योजक एलन मस्क (elon musk) यांचे नाव झळकू लागले होते. तसेच प्रोफाईलला माशाचा यांचा फोटो ठेवण्यात आल्याने मंत्रालयात खळबळ उडाली होती. याचबरोबर काही ट्विटदेखील करण्यात आले होते.

PHOTO : मुकेश अंबानींकडून अलिशान हॉटेलची खरेदी; तब्बल ७३५ कोटींची गुंतवणूक

ही बाब लक्षात येताच काही वेळात हे अकाऊंट पुन्हा रिस्टोअर करण्यात आले, तसेच ट्विटदेखील हटविण्यात आले. हॅकरने केलेले ट्वीट्स डिलीट करण्यात आले. तसेच, प्रोफाईल फोटो देखील पुन्हा पूर्ववत करण्यात आला. त्यानंतर ट्विटरवर रीतसर ट्वीट करून सर्वांना ही माहिती देण्यात आली आहे.

‘या’ ड्रामा क्वीनची Bigg Boss च्या घरातून एक्झिट

दरम्यान हे हॅकर्स तेच असू शकतात ज्यांनी यापूर्वी पंतप्रधान मोदींचे ट्विटर अकाउंट (pm modi twitter account hack) हॅक केले होते. कारण त्यावर नेमका तोच मजकूर पाहायला मिळत आहे जो तेव्हा दिसला होता. यापूर्वी ICWA, IMA आदींचे ट्विटर अकाउंटही हॅक करण्यात आले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या