Friday, May 3, 2024
Homeमनोरंजनसुभाष घई यांची '३६ फार्महाऊस'मधून ओटीटीवर एन्ट्री

सुभाष घई यांची ‘३६ फार्महाऊस’मधून ओटीटीवर एन्ट्री

मुंबई | Mumbai

ज्येष्ठ चित्रपट निर्माते सुभाष घई (Subhash Ghai) हेदेखील आता ओटीटी प्लॅटफॉर्मकडे (OTT platform) वळले आहे. त्यांचा पहिला चित्रपट 36 फार्महाऊस (36 Farmhouse) लवकरच प्रदर्शित होत आहे. हा एक कमी बजेटचा विनोदी-थ्रिलर चित्रपट (Movie) आहे…

- Advertisement -

ज्यामध्ये संजय मिश्रा (Sanjay Mishra), विजय राज (Vijay Raj), अमोल पराशर (amol parashar), बरखा सिंग (Barkha Singh), अश्विनी काळसेकर (Ashwini Kalsekar) आणि फ्लोरा सैनी (Flora Saini) मुख्य भूमिकेत आहेत. नुकताच एका व्हर्च्युअल इव्हेंटमध्ये या चित्रपटाचा ट्रेलर लाँच (Trailer launch) करण्यात आला आहे.

36 फार्महाऊस हे मुळात खुनाचे (Murder) रहस्य आहे. समाजातील आर्थिक विषमता या चित्रपटातून व्यंगात्मक पद्धतीने मांडण्यात आली आहे. काही गरजेपोटी चोरी करतात तर काही लोभापोटी चोरी करतात या संदेशावर कथेचा फोकस असणार आहे.

चित्रपटाचे लेखन सुभाष घई यांनीच केले असून संगीतही त्यांनीच दिलेले आहे. 36 फार्महाऊसचे दिग्दर्शन राम रमेश शर्मा (Ram Ramesh Sharma) यांनी केले आहे. हा चित्रपट २१ जानेवारीला Zee5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या