Friday, May 3, 2024
Homeनाशिकदेवळ्यात एक जागा बिनविरोध, तीन जागांसाठी मतदान सुरु

देवळ्यात एक जागा बिनविरोध, तीन जागांसाठी मतदान सुरु

देवळा | प्रतिनिधी Deola

देवळा नगरपंचायत निवडणुकीत ओबीसी आरक्षणामुळे रद्द झाल्यामुळे चार जागांवर मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार होती. मात्र, प्रभाग १३ मधील उमेदवार बिनविरोध निवडून आल्यामुळे आज सकाळी साडेसात वाजेपासून तीन प्रभागांत निवडणूक प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे….

- Advertisement -

प्रभाग क्र. ४, ८ व १० या प्रभागात मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. सकाळच्या सत्रात चांगला प्रतिसाद मतदारांनी दिलेला दिसून येत आहे.

रविवारी प्रचाराची रणधुमाळी थंडावल्यानंतर प्रचार सोशल मीडियाच्या आखाड्यात गेला होता. प्रभाग क्र. ४ साठी श्री शिवाजी मराठा इंग्लिश स्कुल येथे व प्रभाग क्र. ८ साठी कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयात मतदान केंद्र असून प्रभाग क्र. १० साठी जि.प. प्राथमिक शाळेत मतदान केंद्र आहे.

नाशिकच्या चार नगरपालिकांमध्ये मतदान सुरु; पहिल्या तीन तासांतील प्रतिसाद असा

प्रत्येक मतदान केंद्रात एक पीआरओ, दोन मतदान अधिकारी, एक पोलिस व शिपाई अशा एकूण सहा कर्मचाऱ्यांची नेमणुक करण्यात आली असून तीन मतदान केंद्रांसाठी १८ कर्मचाऱ्यांची नेमणुक करण्यात आली आहे. मतदान केंद्राबाहेर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

प्रभाग क्र. ४ व ८ मध्ये तिरंगी व प्रभाग क्र. १० मध्ये दुरंगी लढत होत असून प्रभाग क्र. ४ मध्ये होणाऱ्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

भाजपाने यापूर्वीच तीन प्रभागातून आपले उमेदवार बिनविरोध निवडून आणण्यात यश मिळवत आघाडी घेतली आहे. उद्या (दि. १९) रोजी देवळा वाजगाव रस्त्यावर असलेल्या नवीन प्रशासकीय कार्यालयात मतमोजणी होणार आहे.

प्रभागनिहाय मतदार संख्या –

१ )प्रभाग क्र. ४- ६१२

२ ) प्रभाग क्र. ८- ६०१

३ ) प्रभाग क्र. १०- ४२६

- Advertisment -

ताज्या बातम्या