Saturday, May 4, 2024
Homeजळगाव‘व्हॅलेंटाइन-डे’ विरोधात ‘राडा’

‘व्हॅलेंटाइन-डे’ विरोधात ‘राडा’

जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

धर्माच्या नावाखाली तरुणांना चिथावणी दिल्याने काही तरुणांनी हॉटेलमध्ये व्हॅलेन्टाईन डे (Valentine Day) साजरा करणार्‍या जोडप्यांना हुसकवून लावले. तसेच हॉटेलमधील जोडप्यांमध्ये दहशत निर्माण करुन जमावबंदीचे उल्लंघन (Violation of the curfew) केल्याची घटना आज दुपारी मोहाडी रोडवरील हॉटेल गोल्डन नेस्ट (Hotel Golden Nest) येथे घडली. याप्रकरणी त्या 11 जणांविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

व्हॅलेन्टाईन डे ((Valentine Day)) निमित्त रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिस कर्मचारी पेट्रालिंग करीत होते. याचवेळी 15 ते 20 जण दुचाकीवरुन मोहाडीरोडवरील हॉटेल गोल्डन नेस्ट (Hotel Golden Nest) याठिकाणी आले आणि ते दादागिरी करीत हॉटेमध्ये घुसले. यावेळी त्या तरुणांमधील एकाने हॉटेलच्या मॅनेजरला धमकवित आज व्हॅलेन्टाईन डे ((Valentine Day)) आहे हा सण आपल्या धर्माचा नाही तू जर व्हॅलेन्टाईन डे ((Valentine Day)) साजरा करणार्‍या जोडप्यांना याठिकाणी बसू दिले तर आम्ही सर्व जण मिळून नुकसान करू असे म्हणत त्याठिकाणी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तसेच हॉटेलमधील ग्राहकांना शिव्या देत त्यांना हाकलून दिले.

गोंधळ घालणारा हितेश बागुल याला पोलिसांनी पकडून त्याची चौकशी केली. त्याने त्याच्यासोबत असलेल्या सुशिल इंगळे, अजय मल्हारा, राहूल कोळी, तेजस कोळी, विशाल सुरळकर, सुनिल सैंदाणे, विजय तायडे, आशिष ठाकरे यांची नावे सांगितली. तसेच या सर्वांना धमकी देण्यास कुणी सांगितले याबाबत विचारणा केली असता, त्यांनी मोहन अंबिकाप्रसाद तिवारी व नरेश आत्माराम सोनवणे यांनी सां गितल्याचे त्या तरुणांनी सांगितले.

चिथावणी दिल्याने तरुणांनी घातला गोंधळ

व्हॅलेन्टाईन डे (Valentine Day) आपला सण नसून तो आपल्या देशाची व समाजाची प्रतिमा खराब करीत आहे. त्याला विरोध करण्यासाठी आपण पोलिसांकडे रॅलीची परवानगी मागितली होती मात्र त्यांनी नाकारली. हा आपल्यावर अन्याय असून तुम्ही प्रत्येक हॉटेलमध्ये जावून व्हॅलेन्टाईन डे साजरा करणार्‍या जोडप्यांना हुसकवून लावून त्यांचे हातपाय तोडा असेही मोहन तिवारी व नरेश सोनवणे यांनी तरुणांना चिथावणी दिली. त्यामुळे या तरुणांनी हॉटेलमध्ये गोंधळ घातल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.

यांच्याविरुध्द पोलिसात गुन्हा

पोलिस कर्मचार्‍याने दिलेल्या तक्रारीवरुन हितेश संजय बागुल रा. दांडेकर नगर पिंप्राळा, सुशिल इंगळे रा. पिंप्राळा, अजय मल्हारा, राहूल सुधाकर कोळी, तेजस मोहन कोळी, विशाल सुरळकर, सुनिल दुर्योधन सैंदाणे उर्फ कोळी उर्फ भाचा, विजय चंदू तायडे रा. पिंप्री ता. यावल, आशिष शैलेष ठाकरे रा. वाल्मिकनगर यांच्यासह आर. के. गु्रपच्या 1 ते 2 जणांसह मोहन अंबिकाप्रसाद तिवारी, नरेश आत्माराम सोनवणे यांच्याविरुद्ध बेकायदेशीर मंडळी जमवून हॉटेलात गुन्ह्याच्या उद्देशाने प्रवेश करीत मॅनेजरला धमकवीत ग्राहकांना हुसकवून लावल्यामुळे ग्राहकांमधये भिती निर्माण झाली. यप्रकरणी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिंदू राष्ट्रसेनेचा विरोध!

जळगाव ।

व्हेंलेंटाईन डे ला प्रेमीयुगलांकडून होणार्‍या अश्लिल चाळ्यांना प्रतिबंध घालण्यासाठी हिंदूत्ववादी संघटनां आक्रमक झाल्या होत्या. दरम्यान, शहरातील मेहरुण तलाव परिसरासह शहरांतील हॉटेल्समध्ये जावून त्यांनी पाहणी करीत झाडाझडती घेतली. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

पाश्चात्य संस्कृती असलेल्या व्हेलेन्टाईन डे ला हिंदू राष्ट्र सेनेकडून विरोध केला जात आहे. दरम्यान, गेल्या तीन दिवसांपुर्वी हिंदू राष्ट्र सेनेकडून सार्वजनिक ठिकाणी व्हेलेन्टाईन डे साजरा करणार्‍या प्रेमीयुगुलांचे लग्न लावून देण्याचा इशारा त्यांनी दिला होता. तसेच महाविद्यालयाच्या नावाखाली तरुण तरुणी या दिवशी अश्लिश चाळे करीत असून ते त्यांच्या कुटुंबियांपर्यंत पोहचविण्यासाठी हिंदू राष्ट्र सेनेच्या पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांकडून शहरात विविध ठिकाणी मोटारसायकल रॅलीच्या माध्यमातून गस्त घातली जात आहे. त्यानुसार आज सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास हिंदू राष्ट्र सेनेकडून टॉवर चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी मोहन तिवारी, मंगला बारी यांच्यासह हिंदू राष्ट्र सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अन् पोहचले पोलीस

शहरातील मेहरुण तलाव परिसरात प्रेमीयुगुल फिरत असल्याची माहिती हिंदू राष्ट्र सेनेच्या पदाधिकार्‍यांना मिळाली. यावेळी सुमारे 50 ते 60 मोटारसायकलस्वार मेहरुण तलाव परिसराच्या दिशेने निघाले होते. दरम्यान, याची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी मेहरुण तलाव परिसरात धाव घेत प्रेमीयुगुलांना त्याठिकाणाहून हटकले.

व्हेलेन्टाईन डे साजरा करण्यासाठी प्रेमी युगल शहरातील हॉटेल्स, रेस्ट्रॉरंटमध्ये जात असल्याने काही हिंदूत्ववादी संघटनांकडून हॉटेल्स व रेस्ट्रॉरंटची पाहणी केली जात होती. काही तरुण शिरसोली रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये जात असल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी इम्रान सैय्यद व गोविंदा पाटील हे गस्तीवर असतांना त्यांना मिळाली. त्यांनी तात्काळ ही घटना प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक कांबळे यांना कळवित त्या हॉटेलच्या परिसरात धाव घेतली. याठिकाणी गोंधळ घालणार्‍या तरुणांना ताब्यात घेत त्यांच्या दुचाकी देखील ताब्यात घेण्यात आल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या