Friday, May 3, 2024
Homeनगरशिवरायांनी महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले - पांडुरंग अभंग

शिवरायांनी महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले – पांडुरंग अभंग

भेंडा |वार्ताहर| Bhenda

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रिया व शेतकर्‍यांच्या शेतीमाल सुरक्षिततेला प्राधान्य दिले, असे प्रतिपादन संत ज्ञानेश्वर मंदिर समितीचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी केले.

- Advertisement -

भेंडा येथे सिद्धांत नवले व किशोर मिसाळ यांच्या पुढाकाराने आयोजीत सार्वजनिक शिवजयंती उत्सव कार्यक्रमात श्री.अभंग बोलत होते.

प्रारंभी भेंडा खुर्द ते भेंडा बुद्रुक बस स्थानक चौक अशी एक किलोमीटर अंतराची पारंपरिक वाद्यांच्या गजरात भव्य शिवप्रतिमा मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत तरुणांसह महिलांचा सहभाग उल्लेखनीय होता. बसस्थानक चौकात मुख्य कार्यक्रम झाला.अंकुश महाराज कादे, श्री.अभंग व इतर मान्यवरांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले.

श्री.अभंग म्हणाले, शिवाजी महाराज हे संयमाने वागणारे राजे होते. रयतेप्रमाणे मावळ्यांच्या सुरक्षिततेलाही त्यांनी प्राधान्य दिले.

अत्यंत कमी सैन्य बळावर त्यांनी जुलमी मोगली सत्ता उलथून लावली. अनेक मोहिमा, लढाया शिवाजी महाराजांनी गनिमी कावा करून जिंकल्या. शत्रूचे सैन्य कितीही प्रचंड असले, तरी काही मावळ्यांच्या मदतीने शिवाजी महाराजांनी शत्रूचा पाडावच केला. स्वराज्य स्थापन करताना शिवाजी महाराजांनी शेकडो किल्ले बांधले. महाराजांचे तत्व प्रत्येकाने अंगिकारले पाहिजे.

शिक्षिका मनीषा धानपुणे यांनी स्रियांचा सन्मान राखणारा व शेतकर्‍यांच्या मालमत्तेचे रक्षण करणार्‍या या राजांचे कार्य आपल्या कृतीमध्ये आणावे, असे आवाहन केेले. पृथ्वीराज डोणगावकर यांनीही मनोगत व्यक्त केले.

यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष काशिनाथ नवले, जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे, बाजार समितीचे सभापती डॉ. शिवाजी शिंदे, तुकाराम मिसाळ, अशोकराव मिसाळ, गणेश गव्हाणे, जलमित्र सुखदेव फुलारी, भेंडा बुद्रुकचे उपसरपंच दादासाहेब गजरे, भेंडा खुर्दचे सरपंच सुनील खरात, उपसरपंच रवींद्र नवले, अशोक वायकर, कुमार नवले, हरिभाऊ नवले, यडूभाऊ सोनवणे, ज्ञानेश्वरच्या संचालिका रत्नमाला नवले, लताताई मिसाळ, भेंडा बुद्रुकच्या सरपंच वैशाली शिंदे, ग्रामपंचायत सदस्या स्मिता काळे, संगीता गव्हाणे, प्रा. उषा मिसाळ, सुहासिनी मिसाळ, मंगल गोर्डे, मिरा नवले, माधुरी नवले, मिरा गुंजाळ आदी उपस्थित होते.

शिवजयंती आयोजक सिद्धांत नवले यांनी प्रास्ताविक केले. रवींद्र डौले यांनी सूत्रसंचालन केले तर किशोर मिसाळ यांनी आभार मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या