Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याआद्य स्काऊट लॉर्ड बेडन पॉवेल

आद्य स्काऊट लॉर्ड बेडन पॉवेल

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

स्काऊट -गाईड (Scout-Guide) हा विनयशील, निष्ठावान, सर्वांचा मित्र, प्राणीमात्रा व निसर्गावर प्रेम करणारा, शिस्तप्रिय, धैर्यवान व विचारआचाराने पवित्र असतो.

- Advertisement -

हे सर्व नियम विद्यार्थ्यांमध्ये (students) शालेय जीवनात (school life) रुजले तर भावी पिढी सक्षम होईल या उद्देशाने स्काऊट गाईड या विषयाचा अभ्यास क्रमात समावेश केला. मात्र आज भारत स्काऊट आणि गाईड (India Scout and Guide) या संस्थेचा कारभारच अनियमित झाल्यामुळे प्रशासक नेमण्याची वेळ आली आहे.

आज स्काऊट गाईडचे संस्थापक लॉर्ड बेडन पॉवेल (Lord Baden Powell, founder of Scout Guide) यांचा जन्मदिवस (चिंतन दिवस). त्यानिमित्ताने प्रत्येकाने अनुभवलेल्या स्काऊट गाइर्डची सद्यस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता वरील चित्र दिसत आहे. लॉर्ड बेडन पॉवेल यांचा जन्म लंडन (London) येथे 22 फेब्रुवारी 1857 रोजी झाला. वडील चर्च ऑफ इंग्लडचे धर्मगुरू व ऑक्सफर्ड विद्यापीठात (Oxford University) प्राध्यापक होते.

ते तीन वर्षाचे असताना पितृछत्र हरपले. त्यामुळे आई हेनरियाएट (Henrietta) यांनी त्यांचा साभाळ केला. चार्टर हाऊसमध्ये शाळेत शिकतांना शेजारच्या जंगलात प्राथमिक कौशल्ये (Basic skills) शिकले. 20 मुलांना घेऊन ब्राऊन्सी बेटावरती (Brownie Island) एक आठवड्याचे विविध प्रकारच्या सामाजिक भिन्नता असलेल्या वीस मुलांना घेऊन आठवडाभर चाचणी शिबिराचे आयोजन केले आणि ते यशस्वी झाले.

पहिल्या महायुद्धानंतर आंतरराष्ट्रीय सहकार भावना नष्ट झाल्यामुळे औटींग चळवळ थोडी मंदावली.पहिले महायुद्ध संपल्यानंतर ऑलिंम्पिया लंडन येथे आंतरराष्ट्रीय स्केटिंग अधिवेशन आयोजित करून लॉर्ड बेडन पॉवेल (Lord Baden Powell) यांना मुख्य स्काऊट म्हणून घोषित करण्यात आले.विद्यार्थ्यांना पारंपरिक पद्धतीने शिक्षण न देता स्व:ता कृतीतून अनुभवातून निसर्गाच्या सान्निध्यात त्यांना शिक्षण घेता यावे हे त्यांंचे ध्येय होते.

1910 साली सेवानिवृत्त झाल्यानंतर पुढील आयुष्य त्यांनी बालवीर संघटनेसाठी वाहून घेतले. पुढे त्यांच्या पत्नी लेडी बेडन पावेल (Lord Baden Powell) यांनी त्यांचे व्रत स्वीकारून 1912 ते 13 च्या दरम्यान बालवीर व विरबाला बेल्जियम (Belgium), हॉलंड (Holland), अमेरिका (America), भारत (india), चीन (china), रशिया (russia) इत्यादी राष्ट्रांमध्ये सुरू झाली आणि गेल्या शंभर वर्षांपासून स्काऊट गाईड चळवळ सुरू असून भारतात शालेय जीवनात विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून भारताने ही चळवळ पुढे चालू ठेवली आहे.

प्रत्येक स्काऊट गाईडच्या अंगी विशेष गुणांचे रोपण व्हावे हा उद्देश या संघटनेचा आहे. 22 फेब्रुवारी या दिवशी चिंतन दिनाचे औचित्य साधून भारतात स्काऊट गाईड संस्थेमार्फत प्रत्येक जिल्ह्यात राज्य स्तरावर व आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या विद्यार्थ्यांना आदर्श स्काऊट आणि गाईड पुरस्कार मिळतो. त्यांचा जिल्हा स्काऊट गाईड संस्थेतर्फे सत्कार केला जातो.

काही शिक्षकांनी नॅशनल ट्रेनिंग सेंटर मधून एलटीसी हिमालय अ‍ॅड बँज सारखे ट्रेनिंग घेतली असेल. ही चळवळ ज्या शाळांनी चांगली राबवली असेल अशा शाळांचा सत्कार या कार्यक्रमात होतो.मात्र करोनामुळे हे सर्व कार्यक्रम दोन वर्षापासून बंद आहेत.आता यापुढे तरी ही मरगळ दूर व्हावी, चळवळ पुन्हा जोमाने सुरु व्हावी, विद्यार्थी दशेत सामाजिक मूल्य रुजवून खर्‍या कमाईचे महत्व कळावे हीच सर्वांची अपेक्षा आहे.

स्काऊट गाईडचे ध्येय स्काऊट गाईडचे वचन मी माझ्या शिलास स्मरून असे वचन देतो की, ईश्वर आणि स्वदेश यांच्याविषयीचे माझे कर्तव्य करण्याचा, इतरांना उपयोगी पडण्याचा आणि स्काऊट गाईड नियम आचरणात आणण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करेल.

आर. एम पवार, पंचवटी

- Advertisment -

ताज्या बातम्या