Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिक महापालिकेवर प्रशासक; आयुक्त कैलास जाधव हाकणार कारभार

नाशिक महापालिकेवर प्रशासक; आयुक्त कैलास जाधव हाकणार कारभार

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक महापालिकेची (Nashik Municipal corporation) मुदत येत्या १५ मार्चपर्यंत आहे. निवडणुका विहित वेळेत होत नसल्यामुळे महापालिकेचा कारभार प्रशासकाच्या मार्फत हाकला जाणार आहे….

- Advertisement -

नाशिकच्या महापौरांना सोडवा लागणार ‘रामायण’ बंगला; ‘हे’ आहे कारण

मनपा आयुक्त कैलास जाधव (nmc commissioner kailas jadhav) यांच्यावर प्रशासक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. नगरविकास विभागाने याबाबतचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.

१४ मार्चपासून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आयुक्त कामकाज बघतील. विहित वेळेत महापालिका निवडणूक होत नसल्याने अखेर महापालिकेवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून महापालिका प्रशासनाकडून महापौरांसह (Mayor) लोकप्रतिनिधींना दिल्या जाणाऱ्या सुविधा याबाबत रीतसर नोटीस काढण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली होती. लवकरच महापौर निवासस्थान (mayor banglow) असलेल्या रामायण (Ramayan) बंगल्याचाही ताबा मनपा प्रशासन घेणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या