Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याउत्तरप्रदेशात भाजपची २०० जागांवर आघाडी; कॉंग्रेसला पळता भुई थोडी

उत्तरप्रदेशात भाजपची २०० जागांवर आघाडी; कॉंग्रेसला पळता भुई थोडी

नवी दिल्ली | प्रतिनिधी New Delhi

उत्तर प्रदेश जिंकण्यासाठी भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दुसरीकडे अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीच्या जागादेखील वाढल्या आहेत. उत्तर प्रदेशात 250 जागांचे ट्रेंड समजत आहेत. यामध्ये उत्तर प्रदेशात 403 पैकी २६६ जागांचे ट्रेंड समोर येत आहेत….

- Advertisement -

भाजप आणि सपामध्ये जोरदार चुरस बघायला मिळत आहे. भाजपने २०० जागांवर आघाडी घेतली आहे. त्याचवेळी सपा ७८ जागांवर मुसंडी मारली आहे, तर बसपा २ आणि काँग्रेस ४ जागेवर तर अन्य २ जागांवर आघाडीवर आहे.

प्राप्त माहितीनुसार, देवरियातून भाजप आघाडीवर आहे. या विधानसभा मतदारसंघातून भाजपचे सलभमणि त्रिपाठी आघाडीवर असून भाजप कार्यालयासमोर जल्लोष बघायला मिळत आहे.

उत्तर प्रदेशच्या मैनपुरी विधानसभा जागेवर भाजपा आघाडीवर आहे, वाराणसीच्या कैंटधमधून सौरभ श्रीवास्तव पिछाडीवर आहेत. मतमोजणी सुरू असताना सपाच्या अखिलेश यादव यांनी ट्विट केलं आहे, ‘निकाल अजून बाकी आहे, आता धैर्याची वेळ आहे, मतमोजणी केंद्रांवर रात्रंदिवस जागरुक आणि जाणीवपूर्वक कार्यरत राहिल्याबद्दल सपा-गठबंधनच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे, समर्थकांचे, नेत्याचे, पदाधिकारी आणि हितचिंतकांचे मनःपूर्वक आभार! ‘लोकशाहीचे सैनिक’ विजयाचे प्रमाणपत्र घेऊनच परततात!’ असे अखिलेश म्हणाले आहेत.

कानपूर देहाटच्या सिकंदरा विधानसभेतून बसपाचे उमेदवार लालजी शुक्ला आघाडीवर असून भाजपचे अजित पाल दुसऱ्या क्रमांकावर आहेत. जालौनमध्ये मतपत्रिकांच्या मतमोजणीत तीनही जागांवर सपा पुढे आहे.

कानपूरमधील मतपत्रिकांच्या मतमोजणीत बिथूरमधून भाजपचे अभिजित सिंग सांगा आघाडीवर आहेत. गाझियाबादमध्ये पोस्टल बॅलेटच्या मतमोजणीत शहर विधानसभा आणि साहिबााबाद विधानसभेच्या जागेवरून भाजप आघाडीवर आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गोरखपूर सदर मतदारसंघातून आघाडीवर आहेत. मतमोजणी केंद्रावर एसपींनी वकील तैनात केले. समाजवादी पक्षाने मतमोजणी केंद्रावर वकील तैनात केले असून प्रत्येक विधानसभेच्या जागेसाठी 2 वकील तैनात करण्यात आले आहेत. मतमोजणीच्या वेळी कायदेशीर सल्ला घेण्यासाठी सपाने वकिलांना कामाला लावले आहे.

समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव करहल विधानसभा मतदारसंघातून आघाडीवर आहेत. नोएडामधून भाजपचे उमेदवार पंकज सिंह आघाडीवर आहेत. उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री सिद्धार्थनाथ सिंह अलाहाबाद मतदारसंघातून पिछाडीवर आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या