Saturday, May 4, 2024
Homeक्रीडापिंपळगाव बसवंतची अनुष्का राष्ट्रीय कॅनोईंग स्पर्धेत चमकली

पिंपळगाव बसवंतची अनुष्का राष्ट्रीय कॅनोईंग स्पर्धेत चमकली

पिंपळगाव बसवंत | प्रतिनिधी Pimpalgaon Baswant

नुकत्याच भोपाळ (Bhopal) येथे 32 व्या राष्ट्रीय कॅनोईंग 2022 नौकानयन स्पर्धेत (National canoeing rowing competition) 18 वर्ष खालील गटात महाराष्ट्र कडुन पिंपळगाव बसवंत (pimpalgaon baswant)महाविद्यालयातील अनुष्का संतोष आंबेकर हिची निवड झाली होती.

- Advertisement -

या स्पर्धेत अनुष्काने दमदार कामगिरी करत महाराष्ट्रसाठी कास्य पदकाची कमाई केली. ही विद्यार्थीनी 12 च्या परीक्षा चालु असल्याने इतर स्पर्धेत भाग घेऊ शकली नाही.

त्यामुळे अजून ही काही पदकांची अपेक्षा महाराष्ट्राला होती. परंतु परीक्षेमुळे ते हुकले. या स्पर्धेत बहुमोल मार्गदर्शन प्राचार्य डाॅ.दिलीप शिंदे, हेमंत पाटील यांच्यासह सुलतान देशमुख, विकास वाळुंज आदिचे तिला मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेसाठी अरूण पाटील मोरे, विश्वासराव मोरे, राजेश पाटील, भाऊ घुमरे आदींनी सहकार्य केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या