Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्याकांदा दरात घसरण

कांदा दरात घसरण

लासलगाव। वार्ताहर Lasalgaon

मार्च महिन्याच्या अखेर च्या तीन दिवसांच्या सुट्टीनंतर शनिवार दि.2 एप्रिल रोजी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत ( Lasalgaon APMC ) उन्हाळ व लाल कांद्याची सुमारे 16 ते 17 हजार क्विंटल आवक झाली. 30 मार्चपासून बाजार समितीचे कामकाज सलग तीन दिवस बंद होते. परिणामी शनिवारी बाजार समितीत विक्रीसाठी आलेल्या कांदा बाजारभावात क्विंटलमागे 200 रुपयांची घसरण झाल्याचे पहावयास मिळाले.

- Advertisement -

लाल कांदा देखील 100 रुपयांनी घसरले आहे. मराठी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी बाजारभावाने शेतकर्‍यांना दणका दिल्याने उत्पादन खर्च फिटणे अवघड झाले आहे.

सलग तीन दिवसांच्या सुट्टीनंतर शनिवारी कांदा लिलाव ( Onion Auctions ) सुरू होताच बाजार समितीत शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात शेतमाल विक्रीसाठी आणला. शनिवारी बाजार समितीत उन्हाळा व लाल कांद्याची 16 ते 17 हजार क्विंटल आवक होऊन उन्हाळ कांद्याचे बाजारभाव किमान 400 रुपये, कमाल 1252 रुपये तर सरासरी भाव 1000 रुपये प्रति क्विंटल राहिले.

तर लाल कांद्याचे भाव किमान 300 रुपये, कमाल 903 रुपये तर सरासरी भाव 700 रुपये होते. हंगामाच्या सुरुवातीला असलेला विक्रमी दर जास्त काळ टिकला नाही आणि अवघ्या दोन महिन्यात 2500 ते 3000 रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री होणारा कांदा आता कमीत कमी 300 ते 600 रुपये प्रति क्विंटल वर येवून ठेपला. यामुळे कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या स्वप्नावर पाणी फिरले आहे. आता कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या चिंतेत सापडला आहे. कांदा उत्पादक तोट्यात कांदा विक्री करत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या