Saturday, May 4, 2024
HomeUncategorized१७ दिवसांत पेट्रोल-डिझेल साडेदहा रुपयांनी महागले

१७ दिवसांत पेट्रोल-डिझेल साडेदहा रुपयांनी महागले

औरंगाबाद – aurangabad

दिवाळीनंतर (Diwali) तब्बल चार-साडेचार महिने स्थिर असलेला (Petrol-diesel) पेट्रोल- डिझेलच्या दरवाढीचा आलेख आता पैशापैशांनी वर सरकत आहे. मागील १७ दिवसांमध्ये पेट्रोल-डिझेल लिटरमागे साडेदहा रुपयांनी महागले आहे.

- Advertisement -

२१ मार्चपर्यंत पेट्रोल-डिझेलचे भाव स्थिर होते. पेट्रोल १११.६६ रुपये, तर डिझेल ९५.८२ रुपये लिटर होते. २२ मार्चपासून मात्र इंधनाच्या दरात ८० ते ८५ पैशांची वाढ होत आहे. ७ एप्रिलपर्यंत पेट्रोलचे दर १२२.१६ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर १०६.४० रुपये प्रति लिटरपर्यंत गेले आहेत.

गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये पेट्रोलचे दर ११३ रुपये तर डिझेल १०३ रुपयांपर्यंत गेले होते. उत्तरप्रदेशसह देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने नोव्हेंबर-२०१९ मध्ये पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करत, नागरिकांना गुड न्यूज दिली होती. पेट्रोलवरील उत्पादन शुल्क ५ रुपये तर डिझेलवरील उत्पादन शुल्कात १० रुपयांची कपात केली होती. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरातमोठी घट झाली होती. तेव्हापासून इंधनाचे दर स्थिर होते. मागील काही दिवसांतील सततच्या दरवाढीने उत्पादन शुल्क कपातीच्या गुड न्यूजचा गोडवाही संपल्याचे दिसून येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या