Friday, May 3, 2024
Homeनंदुरबारशहाद्याच्या सुपूत्राने केले ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शन

शहाद्याच्या सुपूत्राने केले ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शन

शहादा | ता.प्र.- SHAHADA

प्रसिद्ध सिने दिग्दर्शक (Cine director) व निर्माते प्रविण तरडे (producer Pravin Tarde) यांचा ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ (Dharmaveer Mukkam Post Thane) हा चित्रपट (Movies) उद्या दि. १३ मे रोजी प्रदर्शित करण्यात येत आहे. या चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक (Assistant Director) म्हणून काम करण्याची संधी शहादा येथील सुपूत्र भुषण अरुण चौधरी (Bhushan Arun Chaudhary) या तरुणाला मिळाली असून छोटेखानी वैद्यकीय अधिकार्‍याची भुमिकादेखील त्याला मिळाली आहे. शहादेकरांसह जिल्हावासीयांसाठी ही गौरवाची बाब आहे.

- Advertisement -

चुंचाळ्यात उद्या साजरा होतोय गुरूशिष्य पुण्यतिथीचा अनोखा सोहळा

शहादा येथील भूषण अरुण चौधरी या तरुणाने आपल्या आधीच्या दोन पिढयांचा चित्रपट गृहातील काम करण्याचा अनुभव लक्षात घेत याच क्षेत्रात करिअर (Career) करण्याचा निर्णय घेतला.

चित्रपट (Movies) क्षेत्रात तीव्र स्पर्धा असल्याने केवळ जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या बळावर पुणे येथे शिक्षण सुरू असतानाच त्याने स्वतःच्या काही शॉर्टफिल्म्स व डॉक्युमेंट्री तयार केल्यात. अनेक शॉर्टफिल्म्सला (shortfilms) राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय चित्रपट महोस्तवामध्ये नामांकन व बक्षीसही मिळाले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व मराठी चित्रपट सृष्टीतील नामवंत निर्माते मनोज विशे यांनी निर्मित केलेल्या ‘अंबरेला’ या चित्रपटाच्या निर्मितीप्रसंगी भूषणला सहाय्यक दिग्दर्शक (Assistant Director) म्हणून काम करण्याची पहिली संधी मिळाली.

लवकरच हा चित्रपट रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. शिक्षण घेत असताना चित्रपट सृष्टीत कुठलाही अनुभव नसताना थेट सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी मिळाल्यानंतर भूषण हा झी टीव्ही हिंदी व बिगबॉस मराठी सिजन २ सारख्या टेलिव्हिजन मधील नामांकित कार्यक्रमात कार्यरत होता. याचदरम्यान त्याने ‘कसं सांगू मी तुम्हाला’ या मराठी गाण्यांच्या अल्बमचे दिग्दर्शन पूर्ण केले. त्यानंतर त्याने अनेक म्युझिक व्हिडीओचे (Music video) दिग्दर्शन केले.

चुंचाळ्यात उद्या साजरा होतोय गुरूशिष्य पुण्यतिथीचा अनोखा सोहळा

पुण्यातील नामवंत चितळे बंधू यांच्या टीव्हीवरील जाहिरातीच्या आकर्षक दिग्दर्शनासह इतर अनेक ब्रॅण्डससाठी जाहिरातींचे दिग्दर्शन केले. त्याची ही वाटचाल सुरू असताना त्याची मराठी चित्रपट सृष्टीतील लेखक पटकथा लेखक दिग्दर्शक व प्रसिद्ध निर्माते प्रवीण तरडे यांच्याशी भेट झाली.

गेल्या वर्षभराच्या कालावधीत प्रवीण तरडे यांनी स्व.आनंद दिघे यांच्या जीवनावर चित्रपट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पटकथा लेखन पूर्ण झाल्यानंतर त्यांनी निर्मितीसाठी या चित्रपटाच्या सहाय्यक दिग्दर्शक म्हणून भूषण चौधरी यांना संधी दिली. त्याचप्रमाणे याच चित्रपटात भूषण हा वैद्यकीय अधिकार्‍याच्या छोटेखानी भूमिकेत दिसणार आहे. अशा पद्धतीने भूषण हा रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.

उद्या दि.१३ मे रोजी ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ (‘Dharmaveer Mukkam Post Thane) हा चित्रपट संपूर्ण राज्यात प्रदर्शित होणार असून शहादेकरांसाठी गौरवाचा क्षण असणार आहे. या चित्रपटात प्रसाद ओक यांची मुख्य भुमिका आहे.

भूषणचे आजोबा व वडील या दोन पिढ्यांनी चित्रपटगृहात गेट कीपर व बैठक व्यवस्थापक म्हणून काम केले तर याच कुटुंबातील तिसर्‍या पिढीने भूषणच्या स्वरूपात रुपेरी पडद्यावर झळकण्याचा बहुमान मिळविला आहे.

चितवी जि.प.गटाची पोटनिवडणूक लक्षवेधी ठरणार!

भूषण गेल्या चार वर्षापासून मुंबई येथील चित्रनगरीत कार्यरत आहे. दिग्दर्शन करण्यासह त्याने ‘दी लार्ज व्हिज्युअल्स’ या नावाची स्वतःची कंपनी स्थापन केली आहे. या कंपनीमार्फत अनेक नामांकित कंपन्यांचे चित्रपट व मालिकांची आकर्षक जाहिरात केली जाते.

त्याचप्रमाणे राजकीय क्षेत्रात विविध निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांचे जाहिरात निर्माण करण्यासह त्यांचे निवडणूक कँपेनिंग केले जाते.

भविष्यात त्याचे स्वतःचे प्रोडक्शन हाऊस निर्माण करुन याद्वारे आपल्या भागातील अनेक विषयांवर चित्रपट निर्माण करण्याचा त्याचा मानस आहे. भुषण हा शहादा येथील रहिवासी तथा शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख अरुण चौधरी यांचा पूत्र आहे

घरात सुरू होता बनावट दारूचा कारखाना : पोलिसांच्या धाडीत झाला उद्धवस्त

- Advertisment -

ताज्या बातम्या