Friday, May 3, 2024
HomeUncategorizedसंभ्रम ; अकरावीचा प्रवेश ऑनलाईन की ऑफलाईन?

संभ्रम ; अकरावीचा प्रवेश ऑनलाईन की ऑफलाईन?

औरंगाबाद – aurangabad

अकरावीच्या ऑनलाईन (Online) केंद्रीय प्रवेश प्रक्रियेमध्ये औरंगाबादचा समावेश करण्यात येणार आहे. यासंबंधीचा अहवाल माध्यमिक व उच्च माध्यमिक (Department of Education) शिक्षण विभागाच्या औरंगाबाद उपसंचालक कार्यालयाने राज्य संचालक कार्यालयाला सादर केला आहे. या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात शुक्रवारी (१३ मे) राज्य संचालक महेश पालकर यांनी (maharastra) राज्यभरातील उपसंचालकांची महत्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत औरंगाबाद जिल्ह्याच्या (Online Eleventh Admission Process) ऑनलाईन अकरावी प्रवेश प्रक्रियेवर अंतिम निर्णय झालेला नाही, अशी माहिती उपसंचालक अनिल साबळे यांनी दिली.

- Advertisement -

औरंगाबाद जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचा कंटाळा येत होता. विद्यार्थी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत सहभागी न होत थेट ग्रामीण भागातील महाविद्यालयात प्रवेश घेता येत होते. परिणामी, शहरातील महाविद्यालये रिकामी राहत होती. त्यामुळे जिल्ह्याला ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमधून वगळण्यात यावे, अशी मागणी काही आमदारांनी केली होती.

या मागणीनुसार, गतवर्षी ऑनलाइन अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेमध्ये औरंगाबाद जिल्ह्याला वगळले होते. मात्र यंदा पुन्हा ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये औरंगाबाद जिल्ह्यासह मराठवाड्यातील इतर सर्व जिल्ह्यात देखील ऑनलाईन अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबवावी, असे आदेश राज्य संचालकांनी दिले होते. या आदेशानुसार औरंगाबाद उपसंचालक अनिल साबळे यांनी अकराबी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसंदर्भात एक अहबाल पाठवला आहे. मात्र या अहबालावर अद्याप मान्यतेची मोहर उमटलेली नाही.

यासंदर्भात राज्य संचालक महेश पालकर यांनी राज्यभरातील उपसंचालकांची महत्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत हा निर्णय होईल, अशी अशा होती. मात्र राज्य संचालकांनी केवळ चर्चा करून राज्य सरकारकडून अद्याप यासंदर्भात निर्णय घेण्यात आलेला नाही, अशी माहिती दिली. त्यामुळे अद्याप तरी औरंगाबादेतील अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसंदर्भात अंतिम निर्णय झालेला नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या