Saturday, May 4, 2024
Homeनगर225 लहान मुले, मुली, वयोवृध्दांना आधार- दळवी

225 लहान मुले, मुली, वयोवृध्दांना आधार- दळवी

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

शिर्डी शहरात साई आश्रया अनाथ आश्रमाची स्थापना दहा वर्षापूर्वी करण्यात आली. दोन अनाथ लहान मुले व एक मुलीला सहारा देण्यासाठी सुरू केलेल्या आश्रमात आता 0ते20 वयोगटातील 125 मुले व 55 मुली असून 50 वयोवृध्द 16 महिला यांचा सांभाळ केला जात आहे. 100 जणासाठी साईबाबा संस्थान अन्नपदार्थ पुरवठा करत असताना साईभक्त, दानशूर, शिर्डी ग्रामस्थ, समता चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सहकार्याने अनाथ आश्रमाची वाटचाल सुरू असुन 7 निराधार मुलीचे विवाह देखील संपन्न झाले आहेत. अनाथ निराधार वयोवृद्ध यांची सेवा हिच खरी सेवा असल्याचे अनाथ आश्रमाचे अध्यक्ष गणेश दळवी यांनी सांगितले.

- Advertisement -

दळवी यांनी सांगितले की योगा, कराटे, नाटक, संगीत क्लास देखील या ठिकाणी सुरू आहेत. पहिली ते चौथी शाळेतील मुले बिरेगाव शाळेत जातात तर 5 ते 10 ची मुले मुली साईनाथ माध्यमिक शाळेत शिक्षण घेत असुन जाण्यासाठी चारचाकी वाहन देखील उपलब्ध करून देण्यात आले आहे. काही विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्यासाठी पुणे येथे गेले असून मुलांना व मुलींना चांगले शिक्षण देऊन पायावर उभे राहण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. साईबाबाचा आशिर्वाद यामुळे तो पूर्ण होईल असा विश्वास श्री. दळवी यांनी व्यक्त केला.

समता पतसंस्थेचे अध्यक्ष काका कोयटे यांनी एक एकर जागा दिली असुन त्या ठिकाणी तीन मजली इमारत उभी करण्यात आली आहे आजही समाजात मानुसकीच्या भावनेतून अनाथांना मदत करणारी अनेक लोक असुन त्या पाठबळावर हा आश्रम सुरू आहे अनाथ मुले मुली यांनी अर्था एकर जागेत विविध मोठमोठे झाडांची लागवड करुन हिरवीगार वनराई तयार करून झाडे लावा झाडे जगवा हा संदेश दिला आहे.

काहींना कोणीच नाही ते अनाथ, काहींना आई तर काही ना वडील नाही. रक्ताच्या नातेवाईकांनी देखील सांभाळण्यासाठी नकार दिला अशा निराधाराचा सांभाळ या ठिकाणी केला जातो त्याला महिला देखील अपवाद नाही या ठिकाणी भेट दिल्यानंतर अजुन ही जगात मानुसकी जीवंत आहे हेच या आश्रमाला भेट दिल्यानंतर लक्षात येते. या ठिकाणी महाराष्ट्र, गुजरात, नेपाळ. दिल्ली येथील देखील लहान मुले आहेत. साईच्या श्रध्दा संबुरी च्या सदेशानुसार काम केले जात आहे या आश्रमाचे महाराष्ट्र नावलौकिक तयार झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या