Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याअंजनेरी हेच हनुमान जन्मस्थान; शास्त्रसंमत निर्णय

अंजनेरी हेच हनुमान जन्मस्थान; शास्त्रसंमत निर्णय

त्र्यंबकेश्वर । प्रतिनिधी Trimbakeshwar

अंजनेरी हेच हनुमानाचे जन्मस्थान आहे (Anjaneri is the birthplace of Hanuman) यात शंका नाही.वेद पुराणे हेच सांगतात. हाच शास्त्रसंमत निर्णय झाला आहे,असे महंत अनिकेत शास्त्री देशपांडे महाराज यांनी बुधवारी सांगितले.

- Advertisement -

दरम्यान, स्वामी गोविंदानंद सरस्वती यांनी गुजरातकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे.शास्त्रार्थ सभेतील साधू -महंत, धर्मगुरु, विद्वान पुरोहित यांनी ब्रम्हांडपुराण, शिवपुराण व संबंधित धर्मग्रंथांच्या माध्यमातून मंगळवारी झालेल्या सभेत मांडलेले मुद्दे शास्त्रसंमत आहेत असे या सभेचे अध्यक्ष वेदशास्त्रसंपन्न गंगाधर शास्त्री पाठक (अयोध्या )यांनी बुधवारी सांगितले.

पाठक शास्री हे राम जन्मभूमी पुजनातील प्रधानाचार्य आहेत, अशी माहिती महंत अनिकेत देशपांडे यांनी दिली. मंगळवारच्या सभेत राडा झाला होता.स्वामी गोविदानंद सरस्वती महाराजांनी हट्ट सोडावा असा सल्ला त्यांना देण्यात आला आहे. या निर्णयाची माहिती महंत देशपांडे महाराज हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांंना देणार आहेत. हनुमान भक्तांच्या प्रार्थनेला देव पावला, अशी प्रतिक्रिया त्रंबकेश्वर अजनेरीचे महंत पिनाकेश्वर महाराज यांनी दिली आहे.

गोविंदानंद सरस्वती भूमिकेवर ठाम

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

कोणत्याही समस्येवर निर्णय झाला पाहिजे. निर्णय झाल्याने वाद मिटतात असे मत किष्किंधा येथील गोविंदानंद सरस्वती (Govindananda Saraswati from Kishkindha)यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. हनुमानाचा जन्म अंजनेरीला नव्हे तर कर्नाटकातील किष्किंधा येथेच झाला या त्यांच्या भूमिकेवर मात्र ते आजही ठाम आहेत.

अंजनेरी हे हनुमानाचे जन्मस्थळ आहे की किष्कींधा, यावर चर्चा करून एकमत करण्यासाठी किष्किंधा पीठाचे महंत गोविंदानंद स्वामी यांनी नाशिकरोड येथे बोलावलेल्या धर्मसभेत प्रचंड वाद झाला. प्रकरण हमरीतुरी व हातघाईवर गेल्यामुळे धर्मसभेचे रुपांतर आखाड्यात झाले. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटांना बाजूला केले. गोविंदानंद यांना संरक्षण देत आतील कक्षात नेले. धर्मसभेची सुरुवात वादाने आणि शेवटही वादानेच झाला. निष्पन्न मात्र काहीच झाले नाही. वादाची दरी आणखीनच रुंदावली. नाशिकच्या महंतांनी गोविंदानंद यांना तातडीने नाशिकबाहेर नेण्याची मागणी केली आहे.

महंत अनिकेत शास्त्री देशपांडे यांच्या नाशिकरोड पासपोर्ट कार्यालयामागील आश्रमात आज ही धर्मसभा झाली. त्याला नाशिक, त्र्यंबकेश्वरचे महंत, पंडित सहभागी झाले होते. गोविंदानंद स्वामी यांनी अंजनेरी हे हनुमानाचे जन्मस्थान नसून किष्किंधा आहे, असा दावा धार्मिक ग्रंथांचे दाखले देत केल्यामुळे वातावरण तापले होते. गोविंदानंद यांनी वाल्मिकी रामायणाचा दाखला दिला आहे. त्याबाबत चार दिवस त्यांनी त्र्यंबकेश्वर येथे पंडित, महंतांशी संवाद साधला. मात्र, सहमती न झाल्यामुळे नाशिकरोडला त्यांनी धर्मसभा बोलावली होती.

गोविंदानंद स्वामींनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, पंप क्षेत्र किष्किंधा हीच हनुमानाची जन्मभूमी आहे. हनुमान जन्मस्थळ अनेक आहेत. काल धर्मसभेत चर्चेसाठी जे प्रतिनिधी आले त्यापैकी दोन सोडले तर कोणाला संस्कृत देखील येत नव्हते. देवी देवतांच्या प्रमाणात सरकारी गॅझेट ग्राह्य धरले जाऊ शकत नाही. केंद्र सरकारकडेही मी गेलो. मात्र, सरकारने आपण या वादात पडणार नाही असे सांगितले. वेगवेगळ्या पुराणात वेगवेगळी कल्प कथा आहेत. ब्रम्ह पुराणात जर अंजनेरीला हनुमान जन्म झाला आहे तर त्याच आपण खंंडन करू शकत नाही. मला फोन आले की गोविंदानंद महाराज हे बनावट आहेत. ते चुकीचे आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या