Friday, May 3, 2024
HomeUncategorizedअखेर चटोपाध्याय वेतनश्रेणीची पडताळणी पूर्ण !

अखेर चटोपाध्याय वेतनश्रेणीची पडताळणी पूर्ण !

औरंगाबाद – aurangabad

औरंगाबाद (Zilla Parishad) जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील विविध कारणांनी वर्षभरापासून प्रलंबित असलेला प्राथमिक (Teacher) शिक्षकांच्या चटोपाध्याय (Chattopadhyaya) वरिष्ठ वेतनश्रेणीचा प्रश्‍न महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या सततच्या पाठपुराव्यामुळे मार्गी लागला आहे. औरंगाबाद जिल्हा परिषदेतंर्गत कार्यरत जवळपास ६४२ पात्र लाभार्थी शिक्षकांची यादी अंतिम झाली आहे.

- Advertisement -

Video : World Bicycle Day : उत्तम आरोग्य आणि पर्यावरणासाठी चालवा सायकल

परिपूर्ण संचिका स्वाक्षरीसाठी सामान्य प्रशासन विभागामार्फत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आली असून ही यादी सोमवार ६ जून रोजी निगर्मित होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत जिल्ह्यात कार्यरत शिक्षकांपैकी सेवेची १२ वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांना चटोपाध्याय वेतनश्रेणी लागू करण्यात येते. त्यानुषंगाने चटोपाध्याय वेतनश्रेणीसाठी शिक्षकांचे प्रस्ताव जिल्ह्यातील ९ पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकार्‍यांकडून जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडे सादर करण्यात आलेल्या प्राप्त प्रस्तावांची पडताळणी करण्याचे रेंगाळलेले काम अखेर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागामार्फत पूर्ण करण्यात आले असून जिल्हा परिषद शिक्षण विभागांतर्गत जिल्ह्यातील ६४२ पात्र शिक्षकांना चटोपाध्याय वेतनश्रेणी लागू करण्यात येणार आहे. यात ५६४ सहशिक्षक, २७ मुख्याध्यापक, १३ केंद्रप्रमुख, १८ माध्यमिक शिक्षक, ७ प्राथमिक पदवीधर शिक्षक, २ चित्रकला शिक्षक, २ शारीरिक शिक्षक पूर्ण झाल्याने जिल्हयातील पात्र शिक्षकांना चटोपाध्याय वेतनश्रेणी लागू होणार तरी केव्हा, यासंदर्भात निर्माण झालेल्या प्रश्‍नचिन्हाला पूर्णविराम मिळणार आहे.

ज्या शिक्षक कर्मचार्‍यांना सेवेतील १२ वर्ष पूर्ण झालेली आहेत अशा कर्मचाऱ्यांना चटोपाध्याय वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करण्यात येते. याबाबत शासनामार्फत वेळोवेळी तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. अशा पात्र कर्मचाऱ्यांकडून प्रस्ताव आल्यानंतर ते यासाठी ज्यावर्षी पात्र ठरत आहेत त्याच्या मागील ३ वर्षाचे गोपनीय अहवाल तपासण्यात येतात. तर सेवापुस्तिकेतून मूळ नेमणूक दिनांक, लाभ देण्याचा १२ वर्ष सेवा पूर्ण दिनांक, जात वैधता प्रमाणपत्र, सेवांतर्गत प्रशिक्षण पुर्ण केल्याची, खातेनिहाय चौकशी चालू नसल्याची आदी बाबींची खात्री करण्यात येते.

शासन निर्णयानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील त्रिस्तरीय समिती अंतिम निर्णय घेत यादीला मान्यता देत असते.यात माध्यमिक शिक्षण अधिकारी या समितीचे सदस्य सचिव तर प्राथमिक शिक्षण अधिकारी सदस्य आहेत.सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांचा समावेश आहे. चटोपाध्याय वेतनश्रेणी लागू व मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांचा निमंत्रित करण्यासाठी प्राप्त प्रस्तावांच्या तपासणीची प्रक्रिया सदस्य म्हणून समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या