Saturday, May 4, 2024
Homeनगरभेंडा बुद्रुक सोसायटी अध्यक्षपदी गव्हाणे; फुलारी उपाध्यक्ष

भेंडा बुद्रुक सोसायटी अध्यक्षपदी गव्हाणे; फुलारी उपाध्यक्ष

भेंडा |वार्ताहर| Bhenda

येथील भेंडा बुद्रुक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी बाळासाहेब कुंडलिक गव्हाणे तर उपाध्यक्षपदी संदीप कारभारी फुलारी यांची बिनविरोध निवड झाली आहे. नेवासा बाजार समितीचे सभापती डॉ.शिवाजीराव शिंदे यांचे नेतृत्वाखाली भेंडा बुद्रुक सोसायटी संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली होती. निवडणूक निर्णय अधिकारी आर.एन. जहागिरदार यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळ सभेत अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाची निवड करण्यात आली.

- Advertisement -

नवनिर्वाचित संचालक अण्णासाहेब शिंदे, राजेंद्र फुलारी, बबनराव तागड, किसन यादव, जगन्नाथ साबळे, रविंद्र गव्हाणे, केशव गव्हाणे, संतोष मिसाळ, रमेश गोर्डे, शिलाबाई देविदास गव्हाणे, साखरबाई मच्छिंद्र मिसाळ उपस्थित होते. निवड बिनविरोध होण्यासाठी लक्ष्मणराव शिंदे, कडूभाऊ काळे, तुकाराम मिसाळ, दत्तात्रय काळे, शिवाजी तागड, अशोकराव मिसाळ, गणेश गव्हाणे, नामदेव निकम, नामदेव शिंदे, अशोक वायकर, डॉ. रावसाहेब फुलारी, अशोकराव गव्हाणे, अंबादास गोंडे आदींनी प्रयत्न केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या