Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्याMaharashtra political crisis : अनिल देशमुख, नवाब मालिकांची सर्वोच्च न्यायालयात धाव, केली...

Maharashtra political crisis : अनिल देशमुख, नवाब मालिकांची सर्वोच्च न्यायालयात धाव, केली ‘ही’ मागणी

मुंबई | Mumbai

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी राज्यपालांकडे धाव घेत ठाकरे सरकार अल्पमतात असल्याचा दावा केला होता.

- Advertisement -

अखेर राज्यपालांनी ठाकरे सरकारला उद्या संध्याकाळी पाच वाजण्यापूर्वी सभागृहात बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. राज्यपालांच्या या आदेशानंतर राज्यात घडामोडींना वेग आला आहे.

तुरुंगात असलेले माजी मंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक यांनीही सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला आहे. बहुमत चाचणीत मतदान करण्यासाठी सोडण्यात यावे, अशी मागणी मलिक आणि देशमुख यांनी केली आहे. आज सायंकाळी ५.३० वाजता त्यांच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

दरम्यान यापूर्वीही आमदार मलिक आणि देशमुख यांनी राज्यसभा व विधानपरिषद निवडणुकीत मतदानचा हक्क बजावण्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र, न्यायालयाने ही परवानगी नाकारली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या