Saturday, May 4, 2024
Homeनगरजिल्हा व तालुका न्यायालयात आज लोकअदालत

जिल्हा व तालुका न्यायालयात आज लोकअदालत

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

न्यायालयीन खटला लढवण्यासाठी लागणारा पैसा व श्रम या दोघांचाही वापर विधायक कार्यासाठी करण्याची संधी लोक न्यायालयातून पक्षकारांना मिळते. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करून आज दि. 13 जुलै 2022 रोजी होणार्‍या लोकअदालतमध्ये नागरिकांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवून फायदा घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा व जिल्हा विधिसेवा प्राधिकरणाच्या नवनियुक्त सचिव भाग्यश्री पाटील यांनी केले आहे.

- Advertisement -

जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली व अहमदनगर जिल्हा न्यायालयातील दोन्ही वकील संघाच्या सहकार्याने आणि अहमदनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने मागील तीन लोकअदालतमध्ये राज्यात दुसरा क्रमांक पटकावलेला आहे. दि. 13 जुलै रोजी जिल्हा न्यायालय अहमदनगर व सर्व तालुका न्यायालयामध्ये लोक अदालतीचे आयोजन करण्यात आलेले आहे.

या लोक अदालतीत तडजोड योग्य प्रकरणे, अर्थात चोरीची प्रकरणे, किरकोळ मारहाणीची प्रकरणे, बँकेची व वित्तीय संस्थेशी संलग्न प्रकरणे, धनादेशाची म्हणजे चेकची प्रकरणे यांचा समावेश होतो. महानगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत यांच्याकडील मालमत्ता कर, पाणीपट्टी, घरपट्टी आणि महावितरण यांचेकडील प्रलंबित वीज देयके अशा स्वरूपाची प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

बँकेकडील व पतसंस्थेकडील प्रकरणांमध्ये व्याजदरात सूट अथवा व्याजदरात माफी मिळून काही प्रमाणात फायदा होतो. पर्यायाने प्रलंबित व वाद पूर्व खटल्यांची संख्या कमी होऊन न्याय व्यवस्थेवरील ताण कमी होतो. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करून या लोकअदालतमध्ये नागरिकांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा. चौकशीसाठी जिल्हा विधी सेवाप्राधिकरण याठिकाणी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या