Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्यानाशकात पावसाची विश्रांती; विसर्ग घटला, गिरणा धरणात मात्र ओघ वाढला

नाशकात पावसाची विश्रांती; विसर्ग घटला, गिरणा धरणात मात्र ओघ वाढला

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिकसह परिसरात (Nashik) आज सकाळपासून पावसाने विश्रांती (Rain in nashik) घेतली आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातदेखील (Dam Catchment area) पावसाने उघडीप दिल्यामुळे धरणातून होणारा विसर्ग कमी करण्यात आला आहे….

- Advertisement -

दारणा धरणातून (Darna Dam) ७ हजर २४४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सद्यस्थितीत केला जात आहे. तर मुकणेतून होणार विसर्ग कमी करून ३५९ वर आणण्यात आला आहे.

दुसरीकडे कडवा धरणातूनदेखील विसर्ग कमी करून १ हजार ३९६ वर आणण्यात आला आहे. वालदेवी धरणातूनदेखील ३४१ क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

तिकडे गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात (Gangapur Dam Water catchment area) पावसाने ब्रेक घेतल्यामुळे येथील विसर्ग कमी करून ९९६ क्युसेक वर आणण्यात आला आहे. आळंदी धरणात ६८७ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. तिकडे भोजापूरमधून सध्यस्थितीत ४५० क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. तर पालखेड धरणातून ३ हजर ७६० क्युसेक पाण्याचा विसर्ग होत असून याठिकाणी पावसाची संततधार सुरु राहिल्यास हा विसर्ग वाढविण्यात येईल असेही बोलले जात आहे.

शहरासह परिसरात पावसाने उघडीप दिली आहे. आज सकाळपासून अनेकदा नाशिककरांना सूर्यनारायणाचे दर्शन झाल्यामुळे नाशिककरांनी आज पावसापासून सुटकेचा निश्वास सोडला. सद्यस्थितीत होळकर पुलाखाली (Holkar bridge) २ हजार ४३९ क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून पूरसदृश्य स्थितीत असलेली गोदावरी काहीशी आज रिकामी होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

जायकवाडी (Jayakwadi Dam) भरले ८९ टक्के

नाशिकला पाऊस (Nashik Rain) सुरु झाला की मराठवाडा वासीयांच्या नजरा नाशिकच्या पुराकडे असतात. जून महिना संपूर्ण कोरडाच गेल्यानंतर यंदा जायकवाडी धरण (Jayakwadi Dam) भरणार की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. मात्र, अवघ्या दोन आठवड्यांच्या पावसाने जायकवाडीची पाण्याची पातळी ८९ टक्क्यापर्यंत पोहोचली आहे. आणखीही नाशिकसह परिसरातील धरणांतील पाण्याचा ओघ सुरु राहिला तर पुढे जायकवाडीतूनदेखील विसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने कंबर कसली असून नदीकाठचा एकूण अंदाज घेतला जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या