Saturday, May 4, 2024
Homeनाशिकपोषण आहार शिजवताना गॅस सिलेंडरला आग; मोठा अनर्थ टळला

पोषण आहार शिजवताना गॅस सिलेंडरला आग; मोठा अनर्थ टळला

लोहोणेर | प्रतिनिधी Lohoner

लोहोणेर ( Lohner ) येथील श्रीराम मंदिरा लगत असलेल्या अंगणवाडी ( Aanganwadi )मध्ये पोषण आहार शिजवत असतांना अचानक आगीचा भडका उडाला मात्र यावेळी प्रसंगावधान राखत अंगणवाडी तील लहान बालकांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याने मोठा अनर्थ व जीवित हानी टळली असली तरी सदर अंगणवाडीत गॅसचा दुसऱ्यादा स्फोट घडण्याचा प्रकार घडला असल्याने शंकेची पाल चुकचुकली असून याबाबत योग्य ती चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

- Advertisement -

याबाबत घडलेली घटना अशी की, येथील वासोळ रस्त्यावर श्रीराम मंदिरा लगत असलेल्या अंगणवाडीत शिक्षण व पोषण आहार घेण्यासाठी सकाळी रोजच्या प्रमाणे २५ ते ३० बालके सकाळी हजर झाले होते. त्याच बरोबर अंगणवाडी सेविका सविता शेवाळे व मदतनीस अर्चना वाघ हया आपल्या कामावर हजर झाल्या होत्या. दररोज प्रमाणे आज सकाळी दहा वाजेच्या दरम्यान शाळेतील उपस्थित बालकांसाठी पोषण आहार शिजवत असतानाच अचानक गॅस सिलेंडर पेटल्याने आगीचा भडका उडाला आगीने रौद्ररूप धारण करण्या पूर्वीच अंगणवाडीत उपस्थित असलेल्या लहान बालकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

यामुळे जीवित हानी टळली आहे.येथील सामाजिक कार्यकर्तेनी सदर अंगणवाडी शेजारील डॉ. सुभाष आहेर व डॉ. स्वप्नील सुर्यवंशी यांच्या दवाखान्यातील अग्निशमन सिलेंडर व पाणी मागवून सदर आग विझविण्यासाठी सरपंच रतीलाल परदेशी, आनंद महाजन, नागेश निकम, समाधान महाजन, सुभाष आहेर,ग्रामविकास अधिकारी यु. बी.खैरनार आदी व ग्रामस्थ व पादचारी यांनी शर्थीचे प्रयत्न केले. व आग आटोक्यात आणली.

यावेळी अंगणवाडीत सेविका सविता शेवाळे, मदतनीस अर्चना वाघ यांचे सह तीन ते सहा वयोगटातील सुमारे २५ ते ३० लहान बालके, तसेच दोन गरोदर माता व दोन लहान बालकांच्या माताही हजर होत्या.मात्र सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी ही याच अंगणवाडीत दुसऱ्यादा गॅसचा स्फोट घडल्याने शंका व्यक्त केली जात असून उलटसुलट चर्चा सुरू आहे.. याबाबत सरपंच रतीलाल परदेशी, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी जयश्री नाईक, पर्यवेक्षक के.एस. चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून तातडीने सर्व अंगणवाडी सेविकांची बैठक घेऊन खबरदारी घेत योग्य त्या सूचना दिल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या