Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्यानॅशनल हेराल्ड गैरव्यवहार; ईडीचे मुंबईत धाडसत्र

नॅशनल हेराल्ड गैरव्यवहार; ईडीचे मुंबईत धाडसत्र

मुंबई । Mumbai

काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि राहुल गांधी यांची चौकशी केल्यानंतर सक्तवसुली संचालनालयाने (ED) नॅशनल हेराल्ड गैरव्यवहारप्रकरणी (National Herald embezzlement case) मुंबई आणि दिल्लीत (Mumbai & Delhi) धाड टाकली आहे…

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील काँग्रेसच्या (Congress) मालकीच्या नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राच्या कार्यालयासह १२ ठिकाणी ईडीने छापेमारी (raid) केली. तसेच दिल्लीनंतर मुंबईत सुद्धा ईडीने एका ठिकाणी छापेमारी केली आहे. मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या (PMLA) फौजदारी कलमांतर्गत छापे टाकले जात आहेत. तसेच नॅशनल हेराल्ड प्रकरणासंदर्भात अतिरिक्त पुरावे गोळा करण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, नॅशनल हेराल्ड गैरव्यवहारप्रकरणी ईडीकडून सोनिया गांधी यांना सातत्याने चौकशीसाठी बोलवण्यात येत असल्यामुळे काँग्रेसने देशभर अनेक ठिकाणी आंदोलने केली होती. तत्पूर्वी ईडीने काँग्रेस नेते पवन बन्सल (Pawan Bansal) आणि मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांची देखील चौकशी करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या