Saturday, May 4, 2024
Homeनगरखर्डा अत्याचार प्रकरणातील खाडे महाराज अद्याप फरार

खर्डा अत्याचार प्रकरणातील खाडे महाराज अद्याप फरार

खर्डा |प्रतिनिधी| Kharda

महिलेला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी खर्डा पोलिसांत गुन्हा दाखल झालेले हनुमानगडाचे मठाधिपती खाडे महाराज घटनेला दहा दिवस उलटूनही अद्याप फरार आहे. पोलिसांना त्यांचा तपास लागत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

- Advertisement -

जामखेड तालुका खर्डा येथे पोलीस ठाण्यात दहा दिवसांपूर्वी, बीड तसेच खर्डा येथील हनुमानगडाचे मठाधिपती बुवासाहेब जिजाबा खाडे यांच्या विरोधात लग्नाचे आमिष दाखवून बळजबरीने शारीरिक संबंध ठेवल्याबद्दल गुन्हा दाखल झालेला आहे. तर याच गुन्ह्यात परस्पर विरोधी मठाधिपती बुवासाहेब खाडे यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यातील सर्व संशयितांना मात्र तात्काळ अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर मारहाण व महाराजाच्या अंगावरील दागिने हिसकावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या उलट गंभीर गुन्ह्यातील व जखमी असलेला मठाधिपती का सापडत नाही असा सवाल विचारला जात आहे. जामखेड तालुक्यातील मोहरी येथील महिलेने 4 ऑगस्ट रोजी सोन्याच्या दागिन्याचे तसेच लग्न करण्याचे आमिष दाखवून संमतीशिवाय आरोपी बुवासाहेब जिजाबा खाडे याने वेळोवेळी बळजबरीने शारीरिक अत्याचार केल्याची फिर्याद दाखल केली आहे. याबाबत खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांना विचारले असता मठाधिपती खाडे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात मांडलेला अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला असल्याचे सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या