Saturday, May 4, 2024
Homeनाशिकगणेशोत्सवात पर्यावरण विषयक जनजागृती

गणेशोत्सवात पर्यावरण विषयक जनजागृती

निर्‍हाळे । वार्ताहर Nirhale

येथील माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षकांनी झाडावर गणेशमूर्ती ( Ganesh Idol on Tree )साकारत पर्यावरणाविषयी प्रेम व्यक्त केले.

- Advertisement -

देव सर्वत्र असून झाडातच देव असल्याची ही संकल्पना मुलांमध्ये रुजवावी आणि पर्यावरणाबद्दल प्रेम निर्माण व्हावे या उद्देशाने ही संकल्पना माडण्यात आली. कलाशिक्षक किशोर सरवार यांनी शाळेतील एका कडूलिंबाच्या झाडाच्या खोडाला बाप्पाचे मुकुट लावून त्याखाळी सोहळ्याने सजवून गणेशाच्या मूर्तीची प्रतिकृती तयार केली.

मुख्याध्यापक इ. के. भाबड यांनी या संकल्पनेचे कौतुक केले. गणेशाची प्रतिकृती येणार्‍या जाणार्‍यांचे आकर्षण ठरत असल्याचे बघायला मिळत आहे. काही ग्रामस्थांकडून याठिकाणी दर्शनाचा लाभ घेतला जात आहे. यासाठी राजाराम आव्हाड, रवींद्र सांगळे, तानाजी मेंगाळ, देवीदास गर्जे, आर. आर. शेळके, जितेंद्र पाटील, विलास शेळके, सुनीता गिते हे परिश्रम घेत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या