Saturday, May 4, 2024
Homeनगरघाटशिरस येथे जनावरांवर लम्पी आजाराची लक्षणे

घाटशिरस येथे जनावरांवर लम्पी आजाराची लक्षणे

करंजी |प्रतिनिधी| Karanji

पाथर्डी तालुक्यातील घाटशिरस येथे जनावरांसाठी लम्पी रोगाने डोके वर काढले असून लंपी सदृश रोगाचे जनावर या गावात आढळल्याने पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला आहे.

- Advertisement -

गावातील इतर जनावरांना या रोगाचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून गावामध्ये डास व गोमाश्या प्रतिबंधात्मक फवारणी करण्याच्या सूचना पशुवैद्यकीय विभागाने दिले आहेत. ज्या गाई म्हशीला लम्पी सदृश आजाराचे लक्षण आढळून आली आहेत त्यासंबंधीचे रिपोर्ट पुण्याला पाठवण्यात आले असून ते रिपोर्ट आल्यानंतर पुढील उपाययोजना केल्या जाणार असल्याची माहिती तिसगाव पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रज्ञा झावरे यांनी दिली आहे.

बुधवार दिनांक 31 ऑगस्ट रोजी घाटशिरस येथील एका शेतकर्‍याची गाय व म्हैस लंपी सदृश आजाराने आजारी असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाला प्राप्त झाल्यानंतर रक्ताचे नमुने पशु रोग अन्वेषण विभाग पुणे येथे पाठवण्यात आलेले असून त्याचा रिपोर्ट अद्याप आलेला नाही तो 2 सप्टेंबर पर्यंत येणे अपेक्षित असल्याचे पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले.

लसीकरण सुरू करण्याची मागणी

गावात लम्पी सदृश आजाराची संशयित जनावर आढळले असल्याची माहिती पशुवैद्यकीय विभागाने दिली असून गावातील इतर शेतकर्‍यांच्या जनावरांना या रोगाचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून प्रत्येक शेतकर्‍याने कीटकनाशक फवारणी करण्याची गरज असून गावातही डास व गोमाश्या प्रतिबंधक फवारणी करणार असून पशुसंवर्धन विभागाने तात्काळ गावात लसीकरण मोहीम हाती घेण्याची मागणी सरपंच गणेश पालवे यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या