Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याकाँग्रेसच्या ७ आमदारांनी घेतली अमित शाहांची भेट

काँग्रेसच्या ७ आमदारांनी घेतली अमित शाहांची भेट

नवी दिल्ली | New Delhi

महाराष्ट्रातील (Maharashtra) आमदारांच्या बंडखोरीनंतर (Rebellion) काही दिवसांपूर्वी गोव्यातील (goa) कॉंग्रेसच्या ८ पैकी ७ आमदारांनी बंडखोरी करत भाजपसोबत (BJP) जाण्याचा निर्णय घेतला होता.

- Advertisement -

त्यानंतर या आमदारांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांची भेट घेतली. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत तसेच गोवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानवडे उपस्थित होते.

भारत जोडोच्या माध्यमातून राहूल गांधी (Rahul Gandhi) देशातील विस्कळीत झालेल्या काँग्रेसला (Congress) एकत्र करण्याचा प्रयत्न करत असतानाच गोव्याचे आठ आमदार फुटल्याने काँग्रेसला जबर धक्का बसला होता.

दरम्यान, भाजपवासी झालेल्या दिगंबर कामत, मायकल लोबो, केदार नाईक, राजेश फळदेसाई, संकल्प आमोणकर, रुडॉल्फ फर्नांडिस तसेच आलेक्स सिक्वेरा या सात आमदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (BJP National President J. P. Nadda) यांची सदिच्छा भेट घेतल्याचे बोलले जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या