Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्याकाँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीतून गेहलोत यांची माघार; 'हे' आहे कारण

काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीतून गेहलोत यांची माघार; ‘हे’ आहे कारण

नवी दिल्ली | New Delhi

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Rajsthan CM Ashok Gehlot) यांनी दिल्लीतील १० जनपथवर काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक (Congress President Election 2022) लढवणार नसल्याचे जाहीर केले…

- Advertisement -

यावेळी गेहलोत म्हणाले की, ”मी काँग्रेसमध्ये एका प्रामाणिक सैनिकाप्रमाणे काम करत आहे. पक्ष नेतृत्वाने विश्वास दाखवून आजपर्यंत अनेक जबाबदाऱ्या दिल्या आहेत. काँग्रेस पक्षाचा एका ओळीचा प्रस्ताव मी पारित करू शकलो नाही, याचे दु:ख मला आयुष्यभर असेल. राजस्थानमध्ये घडलेल्या प्रकाराची मुख्यमंत्री म्हणून नैतिक जबाबदारी घेत मी सोनिया गांधींची माफी मागितली आहे”, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, काँग्रेस अध्यक्षपदासाठी अशोक गेहलोत यांच्या नावाला काँग्रेस नेतृत्वाची सर्वाधिक पसंती होती. मात्र, आता या शर्यतीतून गेहलोत यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह (Digvijay Singh) काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणूक रिंगणात उतरले आहेत. ते उद्या (दि.३०) रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार असून काँग्रेस अध्यक्षपदासाठी दिग्विजय सिंह विरुद्ध शशी थरुर (Shashi Tharoor)आमनेसामने येणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या