Tuesday, May 14, 2024
Homeमुख्य बातम्यासोनोग्राफी केंद्रांची तपासणी मोहीम

सोनोग्राफी केंद्रांची तपासणी मोहीम

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महापालिकेच्या ( NMC ) वतीने शहरातील सोनोग्राफी केंद्रांची आता अचानक तपासणी (inspection of sonography centers)करण्यात येणार आहे. यासाठी शहरातील सर्व सह विभागांमध्ये नोडल अधिकार्‍यांची नेमणूक करण्यात आली असून त्यांच्यामार्फत सोनोग्राफी सेंटरची तपासणी होणार आहे.

- Advertisement -

कायद्याचा भंग करणार्‍या सोनोग्राफी सेंटरवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. यापूर्वी वैद्यकीय अधिकार्‍यांमार्फत तपासणी व्हायची, मात्र आता नोडल अधिकार्‍यांमार्फत तपासणी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

एक तारखेपासून नाशिक शहरात तपासणी मोहीम सुरू करण्यात येणार आहे. महापालिकेच्या वतीने नियमीत शहरातील सोनोग्राफी केंद्रांची तपासणी करण्यात येते. मनपाच्या आरोग्य वैद्यकीय विभागाने सोनोग्राफी केंद्र रडारवर घेतले असून, सर्वांची आता कसून तपासणी सुरू होणार आहे.

महापालिकेकडून शहरातील जवळपास साडेतीनशे सोनोग्राफी केंद्राची तपासणी होणार आहे. तिमाही पद्धतीने या केंद्राचा आढावा घेतला जात असतो. दरम्यान शहरातील काही केंद्रांच्या बाबत नागरिकांच्या वतीने तक्रारी प्राप्त झाले आहेत. तपासणी करताना केंद्रातील रेकॉर्ड अत्यंत बारकाईने तपासण्यात येणार आहे, यात काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास क्रॉस व्हेरिफिकेशन देखील होणार आहे. त्याचप्रमाणे रुग्णांकडून घेण्यात येणारी रक्कम, त्यांना देण्यात येणारा रिपोर्ट आदींची देखील चौकशी होणार आहे. कायद्याचा भंग करणार्‍या केंद्र संचालकांवर कठोर कारवाईच्या होणार आहे.

विभागनिहाय अधिकारी

डॉ. जितेंद्र धनेश्वर (नाशिक रोड), डॉ. गणेश गरुड (नवीन नाशिक), डॉ. विजय देवकर (पंचवटी), डॉ. योगेश कोशिरे (सातपूर), डॉ. चारुदत्त जगताप ( पश्चीम विभाग), डॉ. विनोद पावसकर (नाशिक पूर्व विभाग).

- Advertisment -

ताज्या बातम्या