Saturday, May 4, 2024
HomeUncategorizedदखल: वाढत्या मजुरीने शेतकरी त्रस्त

दखल: वाढत्या मजुरीने शेतकरी त्रस्त

नाशिक | विजय गिते | Nashik

यंदाच्या मोसमात जिल्ह्यात सर्वदूर पावसाने (monsoon) मोठ्या प्रमाणात हजेरी लावली आहे. यामुळे बर्‍याच भागातील खरीप पिकाला (Kharif Crop) अतिवृष्टीचा (heavy rain) फटका बसला आहे. यातून नाही तोच शेतकर्‍यांना (farmers) आता वाढत्या मजुरीचा फटका बसत आहे.

- Advertisement -

सोयाबीन (soybean) सोंगणीला आता हळूहळू वेग येत असून सोयाबीन काढणीसाठी मजूरीचे दर वाढले आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत एकरी 500 ते 1000 रुपयांनी दरवाढ झाल्याचे शेतकर्‍यांकडुन सांगितले जात आहे. जिल्ह्यात पावसाने काहीशी उघडीप दिलेली आहे. सोयाबीन कापणीसाठी शेतकरी मजुरांची (labor) जुळवाजुळव करण्यात व्यस्त आहेत.

ओल असल्याने हार्वेस्टर शेतापर्यंत पोहोचणे कठीण आहे. परिणामी मजुरांकडूनच सोयाबीन सोंगणी, ट्रॅक्टरमध्ये भरणे, सुडी लावण्याचे काम करवून घेतले जात आहे. हार्वेस्टरने सोयाबीन काढणीचा दर एकरी 1500 रुपये आहे, असे शेतकर्‍यांनी सांगितले. यंदा सातत्याने पाऊस झाल्याने काही भागात सोयाबीनला मोठा फटका बसला आहे.

सततच्या पावसाने सोयाबीनची वाढच झालेली नाही. त्यामुळे हार्वेस्टरने (harvester) काढणे शक्य होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे मजुरांकडूनच सोयाबीन सोंगणी करावी लागत आहे. कापणीला प्रतिएकरी साडेपाच हजार रुपये असा दर मजुरांना द्यावा लागत आहे. गेल्या वर्षीपेक्षा हा दर एकरी एक हजार रुपयांनी वाढला आहे.गेल्या वर्षी सोयाबीन सोंगणी व ट्रॅक्टरमध्ये भरून देणे प्रतिएकर 4500 रुपये होते. यावर्षी त्याच कामाचा दर प्रतिएकर रुपये वर पोहचला आहे. एकराला 500 ते 1000 रुपयांची वाढ झाली आहे.वाढत्या मजुरी दरामुळे शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसणार असल्यामुळे शेतकरी (farmers) त्रस्त झाले आहेत.

सततचा पाऊस (heavy rain), त्यामुळे कमी सूर्यप्रकाश परिणामी खरीप हंगामातील (kharif season) सर्वच पिकाची वाढ पुरेशी झालेली नाही. सोयाबीन पिकाचेही असेच झाल्यामुळे यावर्षी मजुरीचे दर वाढले आहेत.शेतकर्‍यांना एकरी 2800 ते हजारांदरम्यान मशागतीला खर्च आला आहे. याशिवाय बियाणे, खतं याचा ताळमेळ नाही. तेव्हा खर्च आणि उत्पादन याचा समतोल राहत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.याबाबत शेतकरी गजानन सोनवणे म्हणाले की,मजुरीसाठी भांडवल नसल्याने व्याजाने पैसे काढून मजुरी द्यावी लागेल.

सतत होत असलेल्या पावसाने सोयाबीनची वाढच खुंटलेली आहे. यामुळे हार्वेस्टरने सोयाबीन काढणे शक्य होणार असल्याने मजुरांकडूनच काढावे लागत आहे.कापणी प्रतिएकर साडेपाच हजार रुपये आहे. गेल्या वर्षीपेक्षा 1000 रुपयांनी हा दर वाढला आहे. शिवाय सोंगलेले सोयाबीन मशीन मधून काढायचे म्हटल्यास एका पोत्याला तीनशे रुपये असा खर्च येत आहे.त्यामुळे आर्थिक मेळ शेतकर्‍यांचा कसा बसणार हा प्रश्न अनुत्तरीत आहे.

– रमेश बदामे,शेतकरी

- Advertisment -

ताज्या बातम्या