Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याजर माझ्या विचारांचा सरपंच निवडून आला नाही तर...; नितेश राणेंची ग्रामस्थांना धमकी

जर माझ्या विचारांचा सरपंच निवडून आला नाही तर…; नितेश राणेंची ग्रामस्थांना धमकी

मुंबई | Mumbai

माझ्या विचाराचा सरपंच निवडून आला नाही तर गावच्या विकासाला निधी देणार नाही. तुम्ही याला धमकी समजा नाहीतर अन्य काही, निधी वाटप आता माझ्या हातात आहे हे लक्षात ठेवा असा सज्जड दम भाजपचे (BJP) आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांनी कणकवली नांदगाव (Kankavali Nandgaon) येथील ग्रामपंचायत निवडणुकीच्या (Gram Panchayat Elections) प्रचारावेळी एका बैठकीत उपस्थितांना दिला आहे…

- Advertisement -

ते म्हणाले की, चुकूनही येथे माझ्या विचारांचा सरपंच (Sarpanch) आला नाही, तर मी एकही रुपयाचा निधी देणार नाही. तितकी काळजी मी नक्कीच घेईन. आता याला हवं तर धमकी किंवा काही समजा. पण आपलं गणित स्पष्ट आहे. त्यामुळे मतदान करताना हे लक्षात ठेवा, असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे.

पुढे ते म्हणाले की, सगळा निधी आता माझ्या हातात आहे. मग तो जिल्हा नियोजन निधी असो किंवा ग्रामविकास किंवा केंद्राचा निधी असो.मी सत्तेत असणारा आमदार आहे. त्यामुळे पालकमंत्री, जिल्हाधिकारी, संबंधित मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री कोणीही मला विचारल्याशिवाय नांदगावमध्ये निधी देणार नाहीत असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान,आमदार नितेश राणेंच्या या धमकीवरून ठाकरे गटाचे (Thackeray Group) आमदार वैभव नाईकांनी (MLA Vaibhav Naik) निशाणा साधला असून राणे यांना सत्तेचा माज आल्याचे म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या