Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्याखा. गोडसेंची संसदेत मागणी; पूर्व शिक्षणाची मान्यता योजना प्रभावीपणे राबवा

खा. गोडसेंची संसदेत मागणी; पूर्व शिक्षणाची मान्यता योजना प्रभावीपणे राबवा

देवळाली कॅम्प । वार्ताहर | Devali Camp

कोवीड (corona) काळात सुमारे तीन वर्षे देशासह महाराष्ट्रातील (maharashtra) वेगवेगळ्या क्षेत्रात स्वयंरोजगार करणार्‍यांना

- Advertisement -

रेकगनाइजेशन ऑफ प्रायर लर्निंगचे (Recognition of prior learning) (पूर्व शिक्षणाची मान्यता कार्यक्रम) ट्रेनिंग (training) देऊन त्यांना सर्टिफिकेट (certificate) देण्याचे काम पूर्णत: बंद झालेले असल्याच्या मुद्द्यावर आज खा. हेमंत गोडसे (MP Hemant Godse) यांनी संसदेमध्ये प्रश्न उपस्थित केला.

त्याचे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांसह (Lok Sabha Speaker Om Birlan) संबंधित खात्याचे मंत्री यांनी स्वागत करून कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले असून त्यात नाशिकचे खा. हेमंत गोडसे यांनी अतिशय प्रभावी मुद्यावर व्यक्त होताना सांगितले की, कौशल्य विकास खात्याकडून (Skill Development Department) सुरू असलेल्या रेकगनाइजेशन ऑफ प्रायर लर्निंग (Recognition of prior learning) ही पंतप्रधानांनी आणलेली योजना अतिशय उत्तम असून या योजनेची व्याप्ती अधिकाधिक वाढावी, यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी खा. गोडसे यांनी संसदेत केली.

या महत्वपूर्ण अचूक प्रश्नावर लोकसभा अध्यक्षांनी खा. गोडसे यांचे विशेष अभिनंदन करत कोवीडमुळे रेकगनाइजेशन ऑफ प्रायर लर्निंग (Recognition of prior learning) या योजनेची गती संथ झाल्याचे मान्य करत येणार्‍या काळात या योजनेची गती तातडीने वाढविण्यात येईल, अशी माहिती दिली. प्रायर लर्निंग ही योजना अमलात आणलेली आहे. परंतु कोवीडमुळे (covid-19) ही योजना जवळपास बंद झालेली आहे.

पंतप्रधानानी आणलेली रेकगनाइजेशन ऑफ प्रायर लर्निंग ही योजना अतिशय उत्तम असून स्वयंरोजगारांचे उद्योग, व्यवसाय वाढीसाठी उपयुक्त अशी आहे. परंतु योजनेचे कामकाज थांबल्याने महाराष्ट्र राज्यात अवघ्या 5 टक्केच स्वयंरोजगारांना योजनेचा लाभ झाला आहे. तरी योजनेचा हेतू आणि त्याचे महत्त्व लक्षात घेऊन सदर योजना तातडीने सुरू करण्याची मागणी खा. गोडसे यांनी संसदेमध्ये केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या