Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्या“राज ठाकरे आमच्यासोबत आले तर...”; शिंदे गटाच्या 'या' मंत्र्याने केलं मोठं विधान

“राज ठाकरे आमच्यासोबत आले तर…”; शिंदे गटाच्या ‘या’ मंत्र्याने केलं मोठं विधान

मुंबई | Mumbai

भाजपासोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे युती करणार असल्याच्या चर्चा चांगल्याच रंगल्या आहेत. यातच आता शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांची मोठं विधान केलं आहे.

- Advertisement -

वृत्त वाहिनीशी बोलताना अब्दुल सत्तार यांनी म्हंटल आहे की, ‘मनसेने कोणाबरोबर जायचं हे राज ठाकरे ठरवतील. राज ठाकरे राज्यातील प्रमुख पुढाऱ्यांपैकी एक आहेत. त्यामुळे त्यांचा निर्णय ते घेतील. राज ठाकरे आमच्याबरोबर आले तर त्यांचं स्वागतच आहे. आमच्या सर्वच नेत्यांनी त्यांना आमच्याबरोबर येण्याचं आव्हान केलं आहे. परंतु शेवटी निर्णय राज ठाकरेंचा आहे. ते काय निर्णय घेणार हे इतर कोणालाही सांगता येणार नाही.’

अब्दुल सत्तार यांच्या या विधानाने पुन्हा एकदा राजकीय चर्चा रंगली आहे. राज ठाकरे शिंदे गटासोबत येणार की नाही? याकडे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या