Tuesday, May 7, 2024
Homeजळगावभर रस्त्यावर व्यापाऱ्याला लुटले

भर रस्त्यावर व्यापाऱ्याला लुटले

जळगाव jalgaon

दुकानातील दिवसभर झालेले पैसे घेऊन घराकडे निघालेल्या ईश्वर मेघाणी (रा.सिंधी कॉलनी) या ड्रायफ्रुट व्यापाऱ्याची (merchant) आठ लाख रूपये असलेली बॅग दबा धरून बसलेल्या तिघ चोरटयांनी (thieves) हिसकावून (robbed) नेल्याची घटना सोमवारी रात्री ९.३० वाजेच्या पांडे चौक परिसरातील राधाकृष्ण मंगल कार्यालयाजवळ घडली्. रात्री घटनास्थळी पोलिसांनी येवून पाहणी केली. त्यानंतर चोरटयांच्या शोधार्थ पथक रवाना झाले होते.

- Advertisement -

बीएचआरच्या 141 बँकांतील 150 खात्यांसह 37 मालमत्तांबाबत सरकारी वकिलांनी दिली मोठी माहिती..

शहरातील सिंधी कॉलनी येथील ईश्वर मेघाणी हे ड्रायपूटचे व्यापारी आहे. यांचे दानाबाजार येथे दुकान आहे. बँकेत भरणा करण्यासाठी सोमवारी त्यांनी आठ लाख रूपयांची रक्कम बॅगेत ठेवले होती. पण, बँकेत भरणा न करता आल्यामुळे रात्री ९.३० वाजेच्या सुमारास ते पैशांची बॅग घेवून घराकडे दुचाकीने निघाले होते. राधाकृष्ण मंगल कार्यालायाजवळील गणेश कॉलनीकडे वळण घेत असताना अचानक रस्त्यावर दबा धरून बसलेल्या तिघे चोरटयानी मेघाणी यांच्या दुचाकीला लावलेली पैशांची बॅग हिसकावून दुचाकीवर असलेल्या दुस-या चोरटयासोबत पोबारा केला. 

पोलिसांची घटनास्थळी धाव

घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, डीवायएसपी संदीप गावीत यांच्यासह जिल्हापेठ, एमआयडीसी आणि एलसीबीच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली.

Beauty Part 2 : विवाह सोहळ्यात असा करा ब्राइडल मेकअप हिवाळ्यात असे करा तुमच्या त्वचेचे रक्षण !

सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी

 मेघाणी यांनी घडलेली घटनेची संपूर्ण हकीकत पोलिसांसमोर कथन केकी. त्यानुसार पोलिसांनी चोरटयांचा शोध घेतला जात होता. यासोबत चोरटे कोणत्या दिशेने आले व गेले याचा सुध्दा तपास पोलिस घेत होते. तर सीसीटीव्ही सुध्दा त्यांनी तपासले.

काही अंतरापर्यंत केला चोरट्यांचा पाठलाग

बॅग घेऊन चोरटे दोन दुचाकीवर पसार झाले. दरम्यान मेघांनी यांच्या मागून घराकडे जात असलेले अमर कारडा यांनी चोरट्यांचा काही अंतरापर्यंत पाठलाग केला. परंतु चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले.

खेडी पर्यंत सुरु होता मोबाईल

बॅगेत मेघाणी यांचा मोबाईल व लॅपटॉप होते. चोरटे खेडी गावापर्यंत गेल्यानंतर त्यांनी मोबाईल बंद करून टाकल्याची माहिती पोलिसांनी दिली.

जिल्ह्यातील 65 गावांच्या पाणीस्त्रोतांना ‘यलो कार्ड’

- Advertisment -

ताज्या बातम्या