Saturday, May 18, 2024
Homeजळगावसासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

चाळीसगाव chalisgaon । प्रतिनिधी

तालुक्यातील तरवाडे पेठ येथील विवाहितेला (married woman) सासरच्या मंडळीनी मानसिक त्रास (father-in-law’s interrogation) देवून तिला अपमानास्पद वागणुक देत तिचा मानसिक छळ केला. सततच्या त्रासाला कंटाळुन विवाहितेने विहिरीत उडी मारुन आत्महत्या (suicide) केली आहे. हि घटना २९ जानेवारी २३ रोजी सांयकाळी 5 वाजेच्या पूर्वी घडली आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला सासरच्या पाच जणाविरोधात गुन्हां दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

तालुक्यातील तरवाडे शिवारातील एकनाथ सखाराम शिंदे यांचे शेतातील विहीरीत रेखाबाई उत्तम शिंदे (वय-42 वर्षे) (रा. तरवाडे ता.चाळीसगाव) यांनी उडी मारुन आत्महत्या केली. आरोपी उत्तम भाऊराव शिंदे, सिंधुबाई भाऊराव शिंदे, लताबाई उर्फ बायडाबाई (पुर्ण नाव माहीत नाही), भिकूबाई सुरेश मांडोळे, प्रल्हाद भाऊराव शिंदे अशांनी मयत रेखाबाई शिंद हिला विविध कारणावरुन मानसिक त्रास देवून तिला अपमानास्पद वागणुक देत होते. आरोपींच्या त्रासाला कंटाळुन यातील मयत हिने आत्महत्या केली आहे.

याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला महादु गरबड़ पिलोरे, वय 67 धंदा शेती रा.न्हावे यांच्या फिर्यादीवरुन उत्तम भाऊराव शिंदे, सिंधुबाई भाऊराव शिंदे, लताबाई उर्फ बायडाबाई (पुर्ण नाव माहीत नाही), भिकूबाई सुरेश मांडोळे, प्रल्हाद भाऊराव शिंदे यांच्या विरोधात गुन्हां दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या