Saturday, May 4, 2024
Homeनगरजिल्हा वार्षिक नियोजन बैठकीत आ. पवार यांनी वेधले लक्ष

जिल्हा वार्षिक नियोजन बैठकीत आ. पवार यांनी वेधले लक्ष

जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed

जिल्हा वार्षिक नियोजन समितीची बैठक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत मुंबई येथे पार पडली. या बैठकीत आ. रोहित पवार यांनी विविध विकास कामांच्या रखडलेल्या निधी तसेच इतर विषयांकडे मंत्र्यांचे लक्ष वेधले.

- Advertisement -

या बैठकीत आ. रोहित पवार यांनी चोंडी येथे अहिल्यादेवी होळकर जयंतीसाठी जिल्हा नियोजन समितीकडून दरवर्षी 25 लाख निधी उपलब्ध होत आहे. यंदाच्या वर्षीची पुढील कार्यवाही करावी आणि पंचवीस ऐवजी पन्नास लाखांची तरतूद करावी अशी विनंती केली. विद्युत रोहित्रांची मागणी ही संपूर्ण नगर जिल्ह्यातच मोठ्या प्रमाणात असून यासाठी प्रस्तावित निधी वाढवण्यात यावे, कर्जत तालुक्यातील भांडेवाडी येथे जैवविविधता उद्यान उभारणीसाठी पहिल्या टप्प्यातील 1.9 कोटी निधी मंजूर असताना यातील 54 लाख रूपयांचा निधी वितरित झाला आहे.

त्यामुळे हा प्रकल्प अर्धवट स्थितीत आहे. उर्वरित टप्प्यातील कामासाठी देखील निधी मंजूर व्हावा, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी आठशे कोटींचा अहमदनगर जिल्ह्याचा प्रलंबित आहे. तो लवकरात लवकर वितरित करण्यात यावा आणि काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे शेतकर्‍यांचे जे नुकसान झाले त्याचे देखील पंचनामे करून लवकरात लवकर मदत देण्याची विनंती केली.

अनेक शाळेच्या इमारती खराब आहेत व अनेक ठिकाणी इमारती देखील नाहीत अशा परिस्थितीत त्या बांधण्यासाठी निधी वाढवून द्यावा व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून 200 किलोमीटरचा आराखडा जो आ. रोहित पवार यांनी बनवला आहे तो जशास तसा स्वीकार करून मंजूर करावा याबाबतचे विषय बैठकीत त्यांच्याकडून मांडण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या