Saturday, May 4, 2024
Homeदेश विदेशस्पॉन्सर नाही मिळाला म्हणून काय झाले...! WPL मध्ये बॅटवर लिहिले MSD O7,...

स्पॉन्सर नाही मिळाला म्हणून काय झाले…! WPL मध्ये बॅटवर लिहिले MSD O7, ठोकलं अर्धशतक

मुंबई | Mumbai

महिला प्रीमियर लीग ४ मार्चपासून सुरू झाली आहे. पहिल्या दोन दिवसांतच या लीगमधून इतकं काही पाहायला मिळालं की चाहते भारावून गेले. रविवारी झालेल्या सामन्यात गुजरात जायंट्स आणि यूपी वॉरियर्सचे संघ आमनेसामने होते, त्यात यूपी वॉरियर्सच्या संघाने गुजरात जायंट्सचा पराभव केला.

- Advertisement -

मात्र, या विजयाचा पाया सोलापूरच्या किरण नवगिरे हिने रचला. तिने सावध फलंदाजी (kiran navgire fifty) करताना ४३ चेंडूत ५३ धावा केल्या. तिने आपल्या खेळीत ५ चौकार आणि २ षटकार मारले. किरणच्या खेळीमुळे यूपी संघाला लक्ष्याचा पाठलाग करण्याची संधी निर्माण झाली, ती हॅरिसने पूर्ण केली. किरणने आपल्या फलंदाजीनेच नव्हे तर आपल्या बॅटनेही चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले.

‘अरे बाप रे…’! सनी देओलला पाहिल्यानंतर नगरमधील शेतकऱ्याची रिॲक्शन, VIDEO व्हायरल

किरण जेव्हा मैदानावर फलंदाजीला आली तेव्हा तिच्या बॅटवर कोणत्याही स्पॉन्सरचे नाव नव्हते. सर्वसाधारण खेळाडूंच्या बॅटवर कोणत्या ना कोणत्या स्पॉन्सरचे नाव दिसते. पण किरणच्या बॅटवर तसे काहीच दिसले नाही. मात्र कॅमेऱ्याने तिच्या बॅटवर जेव्हा फोकस केला तेव्हा त्यावर जे लिहले होते त्याने सर्वांना अश्चर्याचा धक्का बसला आणि तिचे कौतुक देखील वाटू लागले. किरणने बॅटवर MSD 07 असे लिहले होते. किरण ही भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीची फार मोठी फॅन आहे. अनेकदा स्वत: किरणने ही गोष्ट मुलाखतीमध्ये सांगितली आहे.

देशात नवा व्हायरस? सर्दी-खोकला लवकर बरा होईना…; ICMR कडून मार्गदर्शक सूचना जारी

किरणने भारतासाठी ६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. भारताच्या देशांतर्गत सीनियर महिला टी-२० ट्रॉफीमध्ये नागालँडकडून खेळताना तिने १६२ धावांची खेळी केली. जी टी-२० क्रिकेटमधील कोणत्याही महिला आणि पुरुषांची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे.

महानायक अमिताभ बच्चन यांचा शूटिंगदरम्यान अपघात, बरगड्यांना इजा

- Advertisment -

ताज्या बातम्या