Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्यालालूप्रसाद यादवांच्या १५ ठिकाणांवर ईडीची छापेमारी; बिहारसह दिल्लीतही धाडी

लालूप्रसाद यादवांच्या १५ ठिकाणांवर ईडीची छापेमारी; बिहारसह दिल्लीतही धाडी

नवी दिल्ली | New Delhi

भारतीय राजकारणातील बहुचर्चित व्यक्तिमत्व, माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख, लालूप्रसाद यादव यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसते आहे.,,

- Advertisement -

कथित ‘लँड फॉर जॉब’ (Land for Jobs) घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) आज शुक्रवार, दि. 10 मार्च रोजी, लालूप्रसाद यादव यांच्याशी संबंधित असणाऱ्या दिल्ली, पाटणा यांसह अन्य राज्यातील अनेक ठिकाणांवर छापे टाकले. याबरोबरच लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्या कन्या तेजस्वी यांच्या घरासह दिल्लीतील काही ठिकाणी ईडीने छापेमारी केल्याचे सांगण्यात येत आहे.

खतासाठी जात! सांगलीतील प्रकारावरून विधानसभेत खडाजंगी; CM शिंदे म्हणाले…

एवढेच नव्हे तर, ईडीच्या पथकाने राजदचे माजी आमदार अबू दोजाना (Abu Dojana) यांच्या पाटणा येथील घरीही धडक दिली आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांना ED ने चांगलेच धारेवर धरले आहे. गेल्या काही दिवसांपासून माजी मंत्री लालू प्रसाद आणि त्यांच्या कन्या ‘जमिनीच्या बदल्यात नोकरी’ या घोटाळाप्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत.

WPL 2023 : युपी वॉरियर्स-रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू आज आमनेसामने

आजच्या धाडसत्रामध्ये ईडीने दिल्ली, बिहार, आणि उत्तर प्रदेशातील काही ठिकाणांसह जवळपास १५ ठिकाणांवर छापे टाकले, हे छापे लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या ठिकाणांवर टाकले आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

याआधी केंद्रीय तपास यंत्रणेने पाटणा (Patna) येथे राबडी देवी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची चौकशी केली होती. त्याच्या दुसऱ्या दिवशीच सीबीआयचे पथक दिल्लीत मीसा भारती यांच्या घरी पोहोचले होते. त्यानंतर सीबीआयने लालूप्रसाद यादव यांचीही बराच वेळ चौकशी केली होती. लालूप्रसाद यादव हे सध्या दिल्लीत मीसाच्या घरी आहेत. मात्र या चौकशीचक्राने त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना पुरते बेजार केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या