Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याराऊतांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल; म्हणाले, हिंमत असेल तर...

राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल; म्हणाले, हिंमत असेल तर…

मुंबई | Mumbai

अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यात बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसेनेचा कोणताही संबंध नसल्याचा दावा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केला होता. पाटलांच्या या वक्तव्यानंतर शिवसेनेचा ठाकरे गट आक्रमक झाला आहे.

- Advertisement -

मोठी बातमी! म्यानमारमध्ये लष्कराकडून हवाई हल्ला; १०० जणांचा मृत्यू

शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी काल पत्रकार परिषद घेऊन चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा संजय राऊत यांनी त्यांच्या मागणीचा पुनरुच्चार करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

पुन्हा राजकीय भूकंप? १५ आमदार बाद होणार अन् अजित पवार भाजपसोबत जाणार…

यावेळी राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री स्वतःला बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार म्हणून मिरवत आहेत. मग बाळासहेबांच्या अपमानानंतर शांत का? बाळासाहेब यांचे अपमान करणारे आजही तुमच्या मांडीला मांडी लावून बसत असतील तर तुम्ही मिंधे आहात. बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्यांना राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान असता कामा नये या संदर्भात मुख्यमंत्री भूमिका घेणार आहेत का? असा सवाल संजय राऊतांनी (Sanjay Raut) यावेळी विचारला.

पंजाबच्या भटिंडा मिलिटरी स्टेशनवर गोळीबार; चार जणांचा मृत्यू

पुढे ते म्हणाले की, बाळासाहेबांच्या अपमानावर मुख्यमंत्री आणि त्यांची ४० जणांची टोळी काही भूमिका घेणार आहे का? याप्रकरणी खुलासे चालणार नाहीत, आणि तुम्ही नाराजी कसली व्यक्त करत आहात, अपमान करणाऱ्यांच्या ढुंगणावर लाथा मारा. तेही जमत नसेल तर बाळासाहेबांचं नाव घेऊ नका. तसेच मुख्यमंत्र्यांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घ्यावा नाहीतर स्वत: राजीनामा (Resignation) द्यावा, असे संजय राऊतांनी म्हटले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या