Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशAtiq Ahmed : उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट जारी, गँगस्टर अतिक अहमद अन्...

Atiq Ahmed : उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट जारी, गँगस्टर अतिक अहमद अन् त्याच्या भावावर गोळी झाडणारे ते हल्लेखोर कोण?

प्रयागराज | Prayagraj

उत्तरप्रदेशमधील प्रयागराजमधील माफिया अतिक अहमद (Atiq Ahmed) आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद (Ashraf Ahmed) यांना शनिवारी रात्री पोलिस कोठडीत आरोग्य तपासणीसाठी प्रयागराजमधील कोल्विन हॉस्पिटलमध्ये नेले जात असताना वैद्यकीय महाविद्यालयाजवळ पत्रकाराच्या भूमिकेत दुचाकीवरून आलेल्या तीन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. या हत्येचा लाईव्ह थरार कॅमेरमध्ये कैद झाला आहे.

- Advertisement -

अतिक अहमद आणि अशरफ अहमद यांच्या हत्येप्रकरणी योगी सरकारने (Yogi Government) मोठी कारवाई केली आहे. या हत्येप्रकरणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी १७ पोलिसांचे निलंबन केले आहे. हे सर्व पोलिस (UP Police) अतिक अहमद आणि अशरफ अहमदच्या सुरक्षेसाठी तैनात होते. या घटनेनंतर सुरक्षेच्या कारणास्तव उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसंच कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

अंगात पोलिसाचा गणवेश, पायात लाल शूज; फुकटेगिरी करणारा तोतया पोलीस गजाआड

दरम्यान घटनेनंतर हल्ला करणाऱ्या तिघांनी स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केलं. या तिन्ही आरोपींनी अतिक, अशरफ यांची हत्या का केली, यामागे त्यांचा काय हेतू होता, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, त्यांच्या नावाची चर्चा होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हल्ला करणारे तीनही तरुण माध्यम प्रतिनिधी बनून आले होते, असे बोलले जात आहे. लवलेश, सन्नी आणि अरुण अशी नावं हल्ला करणाऱ्या तिघांची असल्याचे सांगण्यात येत आहे.

पिस्तुलातून गोळ्या घालून प्राध्यापकाची हत्या

मिळालेल्या माहितीनुसार, तिन्ही आरोपी वेगवेगळ्या जिल्ह्यात राहणारे आहेत. अतिकचे पाकिस्तानच्या एयएसआयशी व लश्कर ऐ तौयबासोबत संबंध होते, असा दावा आरोपींनी केला आहे. दरम्यान, अतिक अहमद हत्याकांडातील तिन्हे आरोपी वेगवेगळ्या जिल्ह्यातील आहेत. त्यामुळं त्यांची आपापसात ओळख कशी झाली याचा तपास पोलिस करत आहेत.

पुन्हा राजकीय भूकंप? १५ आमदार बाद होणार अन् अजित पवार भाजपसोबत जाणार…

तिघांचे वय २० ते २५ वर्षांपर्यंत आहे. विशेष म्हणजे, अतिक अहमदवर हल्ला केल्यानंतर तिघांपैकी कोणीच पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही. याउलट त्यांच्यावर गोळ्या झाडल्यानंतर तिघांनी ज. श्री रामच्या घोषणा दिल्या आणि पोलिसांसमोर फिल्मी स्टाइलने सरेंडर केलं.

- Advertisment -

ताज्या बातम्या