Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशApple ची भारतात धमाकेदार एन्ट्री, मुंबईत उघडलं पहिलं स्टोअर... खासियत जाणून आवक्...

Apple ची भारतात धमाकेदार एन्ट्री, मुंबईत उघडलं पहिलं स्टोअर… खासियत जाणून आवक् व्हाल

मुंबई | Mumbai

जगप्रसिद्ध मोबाईल कंपनी Appleचे भारतातील पहिलं स्टोअर मुंबईत उघडले आहे. कंपनीचे सीईओ टीम कुक यांनी आज सकाळी ११ वाजता मुंबईत कंपनीच्या पहिल्या फ्लॅगशिप रिटेल स्टोअरचे उद्घाटन केले. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या जिओ वर्ल्ड ड्राईव्ह मॉलमध्ये हे स्टोअर सुरू झाले.

- Advertisement -

Apple च्या या स्टोअरला Apple BKC असे नाव देण्यात आले आहे. हे मुंबईतील वांद्रे कुर्ला भागातील जिओ वर्ल्ड ड्राइव्ह मॉलमध्ये आहे. मुंबई सेंट्रलपासून त्याचे अंतर सुमारे १४ किलोमीटर आहे. त्याचे मासिक भाडे ४२ लाख रुपये आहे. दर तीन महिन्यांनी भाडे दिले जाणार आहे.

हे Apple स्टोअर भारतातील दिग्गज टेक कंपनीचे पहिले स्टोअर आहे आणि येथे ग्राहकांना Apple च्या अनेक सेवा देखील मिळतील. Apple च्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, “नव्या स्टोअरच्या उद्घाटनाचे सेलिब्रेशन करण्यासाठी यूजर्स Apple बीकेसीचा वाॅलपेपर डाऊनलोड करु शकतात. यासह Apple म्युझिकवर खास तयार केलेली प्लेलिस्टही पाहू शकतात.

Apple स्टोअर विषयी खास गोष्टी

  • अधिकृत स्टोअर्स खूप मोठे आहेत. त्यात गर्दी असली तरी कोणतेही प्रोडक्ट पाहण्यासाठी थोडा वेळ थांबावे लागत नाही.

  • Apple स्टोअरमध्ये एक अद्वितीय डिझाइन आहे. मुंबई स्टोअरची रचना शहरातील काळ्या आणि पिवळ्या टॅक्सीपासून प्रेरित आहे. न्यूयॉर्क स्टोअर क्यूब शेपचे आहे.

  • उत्पादन खरेदी केल्यानंतर बिलिंगसाठी रांगेत उभे राहण्याची गरज नाही. Apple Store कर्मचारी बिलिंगसाठी मोबाइल पेमेंट टर्मिनल पद्धत वापरतील.

  • तुम्ही तुमच्या गरजेनुसार मॅकबुक किंवा iMac सारखी उत्पादने कॉन्फिगर करू शकता. या प्रकारची सेवा रिटेलरकडे उपलब्ध नाही.

  • ही दुकाने चांगल्या विनिमय मूल्यासाठी ओळखली जातात. सामान्यतः येथे व्यापार मूल्य Amazon-Flickart सारख्या प्लॅटफॉर्मपेक्षा जास्त असते.

  • या संपूर्ण ॲपल स्टोअरसाठी सोलर एनर्जीचा वापर केला जाईल. यासाठी कंपनीने सोलर पॅनल्सचा वापर केला आहे. स्टोअर ऑपरेशनसाठी फॉसिल फ्यूलचा वापर होणार नाही.

  • हे ॲपल स्टोअर संपूर्णपणे कार्बन न्यूट्रल आणि आणि १०० टक्के रिन्यूएबल एनर्जीवर चालणार आहे. या स्टोअरमध्ये ४.५० लाख टिंबर एलिमेंट्सचा वापर करण्यात आला आहे.

  • Apple BKC मध्ये १०० कर्मचारी असणार आहेत, जे लोकांशी २० भाषांमध्ये बोलू शकतील.

Apple चे भारतातील दुसरे स्टोअर राजधानी दिल्ली येथे उभारण्यात येणार आहे हे स्टोअर सिटीवॉक मॉल इथे उभरले जणार आहे. ही स्टोअर १०,००० ते १२,००० स्क्वेअरफूटमध्ये उभारले जाणार आहे. या स्टोअरचे लॉन्चिंग २० एप्रिल रोजी होणार आहे.

२० एप्रिल पासून ग्राहक सकाळी १० वाजल्यानंतर या स्टोअरमध्ये जाऊन खरेदी करू शकणार आहेत. म्हणजेच Apple चे प्रॉडक्ट घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन किंवा थर्ड पार्टी स्टोअरमध्ये जाण्याची गरज पडणार नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या